आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेटा सुरक्षा विधेयक:डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन विधेयक पावसाळी अधिवेशनात

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डिजिटल वैयक्तिक डेटा सुरक्षा विधेयक पावसाळी अधिवेशात सादर केले जाणार आहे. केंद्र सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालय सोशल मीडिया व्हॉट्सअॅपशी संबंधित प्रायव्हसी पॉलिसीची सुनावणी करत आहे. सुनावणी पाच सदस्यीय घटनापीठ करत आहे. केंद्र सरकारच्या वतीने अटॉर्नी जनरल आर.वेंकटरमणी म्हणाले, की डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन विधेयक तयार आहे. २०१८ मधील सुनावणीत सुप्रीम कोर्टाने फेसबुक आणि व्हाॅट्सअॅपकडे विचारणा केली होती की, ते कोण-काेणती माहिती तिसऱ्या पक्षाला शेअर करतात का?