आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • Digital Voter ID Card; Everything You Need To Know How To Download Voter Id Card Online

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता मतदानकार्डही डिजिटल:आजपासून मतदानकार्डची PDF कॉपी डाउनलोड करता येणार, जुन्या मतदारांसाठी ही सुविधा 1 फेब्रुवारीपासून होणार सुरू

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • राष्ट्रीय मतदार दिनी निवडणूक आयोगाने e-EPIC योजना सुरू केली.

मतदान कार्ड हरवणे किंवा खराब झाल्यास हे पुन्हा बनवणे खूप अवघड काम असते. आता इलेक्शन कमीशनने ही समस्या दूर केली आहे. आजपासून वोटर ID डाउनलोड केले जाऊ शकते. ज्या मतदारांनी गेल्यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अप्लाय केले आहे केवळ तेच 31 जानेवारीपर्यंत वोटर ID डिजिटल फॉर्मेटमध्ये घेऊ शकतात. एक फेब्रुवारीपासून सर्व मतदारांना ही सुविधा मिळेल.

राष्ट्रीय मतदार दिनी निवडणूक आयोगाने e-EPIC योजना सुरू केली. EPIC म्हणजे इलेक्टोरल फोटो आयडेंटिटी कार्ड. याद्वारे आपण आपल्या मोबाइलमध्ये आपला वोटर ID डाउनलोड करू शकतो. त्याची प्रिंटही घेता येते. कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी याची सुरुवात केली. या कालावधीत पाच नवीन मतदारांना ई-मतदान कार्ड देण्यात आले.

वोटर ID मिळण्याची प्रतिक्षा संपली
ही सुविधा सुरू झाल्यानंतर वोटर ID ची वाट पाहावी लागणार नाही. वोटर लिस्टमध्ये नाव सामिल होताच ते डाउनलोड केले जाऊ शकते. वोटर हे कार्ड प्रिंट करुन घेऊ शकता. हे लॅमिनेटही केले जाऊ शकते. याला आपल्या हिशोबाने डिजिटली स्टोर करु शकता.

डिजिटल कार्ड के फायदे

 • नवीन मतदारांना देण्यात येणाऱ्या प्लास्टिक मतदार कार्डपेक्षा e-EPIC वेगळे असेल. हे डिजीलॉकरवर देखील अपलोड केले जाऊ शकते.
 • e-EPIC डाउनलोड करण्यापूर्वी KYC करावे लागेल. ही सुविधा मिळाल्यानंतर, पत्ता बदलल्यास मतदाराला पुन्हा पुन्हा नवीन कार्ड तयार करण्याची आवश्यकता नाही. सिंगल e-EPIC यासाठी पुरेसे असेल. QR कोडमधील बदललेल्या पत्त्यासह ते पुन्हा डाउनलोड केले जाऊ शकते.
 • ज्या मतदारांचे मतदार ओळखपत्र हरवले किंवा खराब झाले आहेत त्यांना डुप्लिकेट कार्ड विनामूल्य डाउनलोड करता येईल. सध्या यासाठी 25 रुपये द्यावे लागतात.
 • या निर्णयाने वन नेशन-वन इलेक्शन कार्ड या योजनेच्या दिशेने पुढे जाता येईल.

तुम्ही कसे E-EPIC डाउनलोड कसे करु शकता?

 • सर्वात पहिले तुम्हाला e-EPIC डाउनलोड करण्यासाठी वोटर पोर्टल, वोटर हेल्पलाइन मोबाइल अॅप किंवा नॅशनल वोटर सर्व्हिस पोर्टलच्या साइडवर जावे लागेल.
 • वोटर पोर्टलची वेबसाइट http://voterportal.eci.gov.in/ आणि NVSP ची साइट https://nvsp.in/ आहे. याव्यतिरिक्त तुम्ही गूगल प्ले स्टोरवरुन वोटर मोबाइल अॅपही डाउनलोड करु शकता.
 • जर e-EPIC डाउनलोड करायचे आहे, मात्र e-EPIC नंबर हरवला आहे तर तुम्हाला इलेक्ट्रोरल रोल फॉर्म http://voterportal.eci.gov.in/ या http://electoralsearch.in/ वर सर्च करा. येथे तुम्हाला तुमचा e-EPIC नंबर सापडू शकतो.

e-EPIC डाउनलोड करण्यासाठी या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील

 • e-EPIC डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला http://voterportal.eci.gov.in/ or https://nvsp.in/ या वोटर हेल्पलाइन अॅपवर जावे लागेल.
 • वोटर पोर्टलवर स्वतःला रजिस्टर किंवा लॉगिन करा.
 • यानंतर मेन्यूवर जाऊन डाउनलोड e-EPIC वर क्लिक करा.
 • EPIC नंबर किंवा फॉर्म रेफरेंस नंबर टाका.
 • OTP ने नंबर व्हेरिफाय करा.
 • डाउनलोड EPIC वर क्लिक करा.
 • जर मोबाइल नंबर कार्डवर दूसरा असेल तर KYC ची प्रोसेस पूर्ण करा.
 • यामध्ये फेस लाइवनेस व्हेरिफिकेशनही करु शकता.
 • KYC च्या मदतीने नवीन नंबर अपडेट करुन e-EPIC डाउनलोड केले जाऊ शकते.

आजपासून वेब रेडियो हॅलो वोटर्सचीही सुरुवात
2011 पासून प्रत्येक वर्षी 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनावर साजरा केला जातो. यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे निवडणूक आयोगाचे वेब रेडिओ हॅलो वोटर्स लॉन्च करणार आहेत.