आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ऑनलाइन न्यूज पोर्टल, ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता केंद्र सरकारची नजर राहणार आहे. यासंबंधीची एक अधिसूचना केंद्र सरकारने बुधवारी जारी केली. यानुसार ऑनलाइन न्यूज पोर्टल्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्स आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत राहणार आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अंकुश ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे
Government issues order bringing online films and audio-visual programmes, and online news and current affairs content under the Ministry of Information and Broadcasting. pic.twitter.com/MoJAjW8fUH
— ANI (@ANI) November 11, 2020
सध्या डिजिटल कटेंटवर नियंत्रण ठेवणारा कोणताही कायदा किंवा स्वायत्त संस्था नाही. प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया प्रिंट मीडियावर, न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशन (एनबीए) न्यूज चॅनेलवर, अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडिया जाहिरातींवर तर सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) चित्रपटाच्या कंटेटवर अंकुश ठेवते. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने स्वायत्त मंडळाने ओटीटी प्लॅटफॉर्मचे नियमन करावे यासंदर्भातील याचिकेवर केंद्राचा प्रतिसाद मागविला होता. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र, माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया यांना यासंदर्भात नोटीस बजावली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.