आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह हे क्लब चॅटवरील ऑडियो संभाषणामुळे भाजपच्या निशाण्यावर आले होते. त्यांनी या ऑडियो संभाषणात काँग्रेस सरकार सत्तेत आल्यावर कलम 370 परत लागू करणार असल्याचे म्हटले होते. यावरुन भाजपने त्यांच्यावर चांगलीच टिकेची झोड उठवली होती. दरम्यान, त्यांनी सोशल मीडियावर आरएसएसचे 6 वर्ष जूने एक विधान शेअर करत भाजपवर पलटवार केला आहे. त्यांनी या विधानावरुन मोहन भागवत यांना पाकिस्तानात पाठवत त्यांची एनआयए चौकशी कराल का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी भाजपवर पलटवार करत सहा वर्ष जून्या बातमीचा हवाला दिला. ज्यामध्ये आरएसएसने पाकिस्तान आपल्या भावासारखा असून सरकारने त्याच्याशी संबंध दृढ केले पाहिजेत असे म्हटले होते.
व्ही.डी. शर्मा यांनी एनआयए चौकशीची मागणी केली
भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही.डी. शर्मा यांनी काँग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंह यांची एनआयए तपासाची मागणी केली होती. ज्यामध्ये त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहत सिंह यांच्या मोबाईलची चौकशी करण्याची मागणी केली.
हे आहे संपूर्ण प्रकरण
क्लब हॉऊस चॅटवरील एक ऑडियो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामध्ये काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह काश्मीरमधील कलम 370 हटवण्याच्या निर्णयावर बोलत आहेत. काश्मीरमध्ये ज्यावेळी कलम 370 हटवले गेले त्यावेळी लोकशाही मुल्याचे कोणत्याच प्रकारचे पालन केले गेले नसल्याचे ते म्हणाले. या विरोधात आवाज उठवण्यार्या प्रत्येक व्यक्तीला कोठडीत बंद करत मानवता कायम ठेवली नसल्याचे सिंह म्हणाले. काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास या निर्णयावर फेरविचार करत हा कायदा लागू करणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.
पाकिस्थानी पत्रकारांनी विचारला होता प्रश्न
राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह हे देश-विदेशातील काही पत्रकारांसोबत व्हर्च्युअली बोलत होते. दरम्यान, शाहजेब जिलानी यांनी कलम 370 शी संबंधित प्रश्न सिंह यांना विचारला. जिलानी हे पाकिस्थानी पत्रकार असल्याचा दावा केला जात आहे. जिलानी यांनी विचारले की, विद्यमान मोदी सरकार गेल्यावर भारताला दुसरा पंतप्रधान मिळेल. त्यामुळे काश्मीरबाबत पुढील मार्ग काय असणार? मला माहिती आहे की, भारताची सध्याची परिस्थिती काय आहे. त्यामुळे हा मुद्दा दुर्लक्षित आहे. परंतु, हा मुद्दा असा आहे जो दीर्घकाळापर्यंत दोन्ही देशांमध्ये होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.