आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Digvijay Singh Said Ignoring The Beliefs Of Sanatan Hindu Dharma, This Is Why The Corona The Priests And Amit Shah Became Positive

राम मंदिराच्या मुहूर्तावर वाद:दिग्विजय सिंह म्हणाले - सनातन हिंदू धर्माच्या मान्यतेकडे दुर्लक्ष केले, यामुळेच पुजाऱ्यांपासून अमित शाहपर्यंत अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह झाले

भोपाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोदीजी तुम्हाला अश्या काळात भगवान राम मंदिराचा शिलान्यास करून किती लोकांना रुग्णालय पाठवायचे आहे? दिग्विजय यांचा सवाल

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख आणि मुहूर्तावर वाद वाढत चालला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी सोमवारी याला कोरोनाशी जोडले.

त्यांनी ट्विट केले की, मंदिर पूजनासाठी हिंदू धर्माच्या मान्यतांकडे दुर्लक्ष केले. यामुळेच गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून राम मंदिराच्या पुजारी कोरोना संक्रमित झाले आहेत. एका ट्विटमध्ये दिग्विजय सिंह यांनी अमित शाह यांना पंतप्रधान संबोधले, नंतर त्यांनी यावर खेद व्यक्त केला.

दिग्विजय सिंह यांनी केले 11 ट्विट

दिग्विजय सिंह यांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी 11 ट्विट केले. म्हणाले, "मोदीजी तुम्ही अशुभ मुहूर्तावर भगवान राम मंदिराचे भूमिपूजन करून आणखी किती लोकांना रुग्णालयात पाठवणार आहात? योगीजी तुम्हीच मोदीजींनी समजवा. तुम्ही असताना सनातन धर्माच्या सर्व मर्यादा का मोडल्या जात आहेत? आणि तुमची काय नाईलाज आहे ज्यामुळे हे सर्व घडू देत आहात?"

1. राम मंदिराचे सर्व पुजारी कोरोना पॉझिटिव्ह.

2. उत्तर प्रदेशच्या मंत्री कमलराणी वरुण यांचे कोरोनामुळे निधन.

3. उत्तर प्रदेश भाजप अध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह.

योदी आणि मोदींनी क्वारंटाइन व्हावे.

दिग्विजय सिंह म्हणाले की, 'अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांनी क्वारंटाइन का होऊ नये? क्वारंटाइन होण्याचा नियम केवळ सामान्य जनतेसाठी आहे का? पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसाठी नाही का?' ते म्हणाले,'भगवान राम कोट्यवधी हिंदूंच्या आस्थेचे केंद्र आहेत. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या मान्यतांसोबत खेळू नका.'

0