आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Digvijay Singh Will Contest The Election For The Post Of Congress President, Latest News And Update

राजस्थान CM पदाचा एक दोन दिवसात निर्णय:सोनिया गांधीना भेटण्यासाठी पायलट दाखल; वेणुगोपाल म्हणाले- निरीक्षक पुन्हा जयपूरला जातील

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी सचिन पायलट 10 जनपथवर पोहोचले आहेत. राजस्थानमध्ये पुढील मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय पुढील एक ते दोन दिवसांत ठरेल. दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी गुरुवारी सायंकाळी माध्यमांशी संवाद साधला. वेणुगोपाल म्हणाले की, पुन्हा एकदा निरीक्षक जयपूरला जाणार आहेत. विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावली जाणार आहे. त्यानंतर गहलोत मुख्यमंत्री पदावर राहणार की नाही याचा निर्णय घेतला जाईल.

दरम्यान, गुरूवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास सचिन पायलटही सोनिया गांधींना भेटण्यासाठी पोहोचले. वेणुगोपाल यांची देखील त्या ठिकाणी उपस्थिती होती. त्याचवेळी वेणुगोपाल यांनी राजस्थानमध्ये भाषणबाजी करणाऱ्या नेत्यांना एक नोटीस जारी केली. यात म्हटले की, राजस्थानतील राजकारणावर सद्या कोणीही भाष्य करू नये. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा देखील देण्यात आला. तत्पूर्वी, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सोनिया गांधी यांची सुमारे दीड तास भेट घेतली. बैठकीनंतर गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, मी काँग्रेस अध्यक्षांशी बोललो आहे. मी नेहमीच एक निष्ठावान सैनिक म्हणून काम केले आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीच्या दिवशी घडलेल्या या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले. मला मुख्यमंत्रीपदी राहायचे होते, म्हणून मी त्यांची माफी मागितली.

गहलोतांनी बैठकीत माफी मागितली

सोनियांसोबतच्या बैठकीत गेहलोत यांनी राजस्थानातील घटनाक्रमाविषयी माफीही मागितली. ते आपल्या माफीनाम्यात म्हणाले - 'मी काँग्रेस अध्यक्षांशी जवळपास दीड तास चर्चा केली. मी काँग्रेसचा सच्चा सैनिक आहे. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत जे काही घडले, त्याने आम्हा सर्वांना हलवून सोडले. त्यातून माझी मुख्यमंत्रीपदाला चिकटून राहण्याची इच्छा असल्याचा संदेश गेला. त्यामुळे मी त्यांची माफी मागितली.'

गेहलोत म्हणाले की, 'पक्षश्रेष्ठी एका ओळीचा प्रस्ताव पारित करण्याचा आमच्याकडे नियम आहे. मुख्यमंत्रिपदी असतानाही मला याची अंमलबजावणी करता आली नाही. त्याचे शल्य मला राहील. या घटनेमुळे देशात अनेक प्रकारचे संदेश गेलेत. गहलोत सोनियां गांधीना भेटण्यासाठी जात होते. तेव्हा त्यांच्या हातात काही दस्तावेज होते. त्यात त्यांनी हाताने लिहिलेला माफीनामा होता. तो पत्रकारांच्या कॅमेऱ्यात कैद झाला. त्यात काही पॉइंट्स लिहिलेले होते. त्यात सर्वात वर जे काही घडले त्याचे दुःख आहे असे लिहिले होते. तर तिसऱ्या ओळीत सचिन पायलट, सी पी जोशी यांच्यासह 4 जणांचे नाव शॉर्टफॉर्म होते.

तत्पूर्वी, ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली. ते गुरूवारी दिल्ली स्थित काँग्रेस मुख्यालयात पोहोचले. तिथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपण उमेदवारी अर्ज घेण्यासाठी आल्याचे व उद्या फॉर्म दाखल करणार असल्याचे सांगितले.

दिग्विजय आजच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत व पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. दुसरीकडे, काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपालही दिल्लीत पोहोचलेत. त्यांनी राजस्थानातील वाद येत्या 1-2 दिवसांत संपुष्टात येणार असल्याचा दावा केला. वेणुगोपाल यांनी सोनियांची भेट घेतल्यानंतर हा दावा केला.

सोनिया नाराज, गहलोत यांची दिल्लीत धाव

राजस्थानातील अशोक गहलोत समर्थक आमदारांच्या बंडखोरीनंतर सोनिया गांधी यांनी या संपूर्ण घटनाक्रमावर नाराजी व्यक्त केली आहे. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीवरील बहिष्कार व गहलोत यांच्या समर्थक मंत्र्यांच्या विधानांमुळे निरीक्षकांनी आपल्या अहवालात हायकमांडच्या आदेशांचे उल्लंघन व गंभीर शिस्तभंगाचा ठपका ठेवण्यात आला आहे.

यासंबंधीची नोटीस जारी झाल्यानंतर आता गहलोत या प्रकरणी आपली बाजू मांडतील. गहलोत गटाने काँग्रेस प्रभारी अजय माकन यांच्यावर पक्षपातीपणाचा व सचिन पायलट यांच्याप्रती सहानुभूती दर्शवण्याचा खुलेआम आरोप केला आहे. त्यामुळे गहलोत राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी कायम राहणार की नाही याचा फैसला लवकरच होण्याची शक्यता आहे.

अध्यक्षपदावर गांधी कुटुंबाच्या उमेदवारीवरही आजच निर्णय

काँग्रेस अध्यक्षपदावर गांधी कुटुंबीयांतर्फे कुणाला उमेदवारी दिली जाईल, याचेही चित्र गुरूवारी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. आज निवडणूक अधिकारी मधुसूदन मिस्त्री अहमदाबादच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे आज कुणीही उमेदवारी दाखल करणार नाही.

उद्या 30 सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे आजच सर्वकाही स्पष्ट होण्याची शक्यता आहे. शशी थरूर यांनीही शुक्रवारी सकाळी 11 वाजता उमेदवारी दाखल करण्याची घोषणा केली आहे. यामुळेही या निवडणुकीतील चुरस वाढली आहे.

बातम्या आणखी आहेत...