आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'केसरिया तेरा इश्क'वर दिग्विजय सिंहांचा डान्स:भाजप नेते उपहासाने म्हणाले -दिग्गीराजांची धारदार चाल कायम राहो

भोपाळ13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह भारत जोडो यात्रेत विश्रांतीच्या क्षणी डान्स करताना आढळले. त्यांचा यासंबंधीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात ते भारत यात्रेकरूंसोबत ब्रह्मास्त्र चित्रपटातील 'केसरिया तेरा इश्क है पिया...' या गाण्यावर थिरकताना दिसून येत आहेत. तसेच शोले चित्रपटातील 'ये दोस्ती हम नहीं तोडेंगे...'वरही ते आपल्या नृत्याची चमक दाखवताना दिसून येत आहेत.

दिग्वजिय सिंह भारत जोडो यात्रेचे समन्वयकही आहेत. त्यांच्या डान्सवर मध्य प्रदेशाचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले - 'धारदार चाल अशीच कायम राहो आदरणीय.' राहुल गांधी भघारकत जोडो यात्रेवर आहेत. यात्रा मध्य प्रदेशच्या जवळ पोहोचली आहे. महाराष्ट्र व एमपी बॉर्डरवर यात्रा 2 दिवस थांबवून राहुल गांधी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला पोहोचलेत.

..हे म्हणाले गृहमंत्री मिश्रा

गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले - दिग्विजय यांचा उत्साहाने भरलेला डान्स व आनंदाने उजळणारा चेहरा, तुमची धारदार चाल अशीच कायम राहो आदरणीय..! उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेस आमदार व माजी मंत्री उमंग सिंघार यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपकडून काँग्रेसवर तिखट टीका सुरू आहे. नरोत्तम यांचे हे विधान याच मालिकेतील एक भाग असल्याचे मानले जात आहे.

मुलाने सांगितले वडिलांच्या फिटनेसचे रहस्य

दिग्विजय सिंह यांचे सुपुत्र व राघवगडचे आमदार जयवर्धन सिंह यांनी आपल्या वडिलांच्या फिटनेसचे रहस्य सांगितले. ते 24 तास 7 दिवस काम करणारे नेते आहेत. ते जवळपास 75 वर्षांचे आहेत. त्यांची राजकीय कारकिर्दही जवळपास 50 वर्षांची झाली आहे. पण आजही राघवजींच्या कृपेने ते तंदुरुस्त आहेत. कष्ट करत आहेत. ज्या व्यक्तीने साडेतीन हजार किमीची पायी नर्मदा परिक्रमा केली होती, तेच आता राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत पदयात्रा करत आहेत. ते दररोज तासभर योगा करतात हे यामागील रहस्य आहे.

ते शिस्तीत योगाचे अनेक प्रकार करतात. त्यानंतर जवळपास 20 मिनिटे पूजाअर्चा करतात. हे सर्व अनेक वर्षांपासून सुरू आहे. काहीही झाले, रात्री 2-3 वा. घरी आले तरी ते सकाळी उठतात व आपल्या रुटीन प्रमाणे योगा, ध्यान व पूजाअर्चा करतात. सामान्यतः ते पहाटे 4-5 वा. उठतात. त्यानंतर योगा करतात. माझ्या मते, त्यांच्याकडून आपण शिस्त शिकली पाहिजे. त्यांची रात्री झोपण्याची कोणतीही वेळ निश्चित नाही. ते त्या दिवसाचे कार्यक्रम व दौऱ्यांवर अवलंबून असते, असे त्यांनी सांगितले.

स्क्वॉशमध्ये भारताचे तिसऱ्या क्रमांचे खेळाडू होते

जयवर्धन यांनी पुढे सांगितले की, दिग्विजय सिंहांना खेळांची मोठी आवड आहे. स्क्वॉशच्या रँकिंगमध्ये ते भारताचे तिसऱ्या क्रमांचे खेळाडू ठरले होते. क्रिकेटचीही त्यांना आवड आहे. शाळा व महाविद्यालय पातळीवर त्यांनी अनेक स्पर्धांत चांगली कामगिरी केली. ते हॉकीचेही उत्कृष्ट खेळाडू ठरले. व्यस्त कार्यक्रमांमुळे ते दररोज क्रीडा प्रकारांत सहभागी होत नसले तरी, जेव्हा केव्हा संधी मिळेल ते नेहमीच त्यात भाग घेतात.

उंग-दिग्विजय सिंहांत मतभेद

उमंग सिंघार राज्याच्या माजी मुख्यमंत्री व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या जमुना देवी यांचे भाचे आहेत. उमंग यांनी राजकारणाची बाराखडी जमुना देवी यांच्याकडूनच आत्मसात केली. पण त्यांचे व दिग्विजय सिंह यांचे फारसे जमत नाही. जमुना देवी व दिग्विजय यांच्यातही फारसे सख्य नव्हते. पण आदिवासी वर्गातील आपल्या वर्चस्वामुळे त्या नेहमीच काँग्रेसमध्ये महत्त्वाच्या पदांवर राहिल्या. उमंग यांनी मंत्रिपदी असताना अनेकदा दिग्विजय सिंहांवर गंभीर आरोप केले होते.

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशाच्या सीमेवर पोहोचली आहे. राहुल गांधी 2 दिवसांसाठी गुजरात निवडणुकीच्या प्रचाराला गेलेत. त्यामुळे यात्रेला ब्रेक देण्यात आला आहे. या ब्रेकमध्ये दिग्विजय सिंहांनी भारत यात्रेकरूंसोबत डान्स केला.

एमपी प्रवेशाच्या तारखेत बदल

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 23 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशात प्रवेश करेल. यापूर्वी ती 20 नोव्हेंबर रोजी या राज्यात पोहोचणार होती. बुधवारी महाराष्ट्राच्या मालेगावमध्ये एमपी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ, काँग्रेसचे प्रदेश प्रभारी जे पी अग्रवाल, विरोधी पक्षनेते डॉक्टर गोविंद सिंह, अजय सिंह राहुल, अरुण यादव, कांतीलाल भूरिया आदी नेत्यांनी राहुल गांधींसोबत चर्चा केली. त्यात मध्य प्रदेशात प्रवेश केल्यानंतर लगेचच यात्रेत ब्रेक न घेण्याची रणनीती ठरवण्यात आली. राज्यात पोहोचल्यानंतर लगेच ब्रेक घेतला तर कार्यकर्त्यांचा उत्साह ओसरेल, असा यामागील हेतू होता.

बातम्या आणखी आहेत...