आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dilip Kumar Has Been Admitted To PD Hinduja Hospital In Mumbai After Breathing Issues Since Past Few Days; News And Live Updates

दिलीप कुमार यांची प्रकृती खालावली:मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल; श्वास घेण्यास होत होता त्रास; कोरोनामुळे दोन भावांचा मृत्यू

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या महिन्यातही रुग्णालयात दाखल झाले होते

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची तब्येत रविवारी अचानक खालावली. त्यांना गेल्या अनेक दिवसांपासून श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. मात्र, रविवारी त्यांची प्रकृती आणखी खालावल्याने त्यांना मुंबई येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या ते डॉ. जलील पारकर यांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत.

गेल्या महिन्यातही रुग्णालयात दाखल झाले होते
मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात गेल्या महिन्यातही दिलीप कुमारांना दाखल करण्यात आले होते. तेंव्हा त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, रुटीन चाचणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले असल्याचे त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी सांगितले. त्यामुळे सर्व चाचणी झाल्यावर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले होते.

कोरोनामुळे दोन भावांचा मृत्यू
गेल्या वर्षी कोरोनामुळे दिलीप कुमार यांनी आपले दोन भाऊ गमावले आहे. यामध्ये 21 ऑगस्टला असलम (88 वर्ष) आणि 2 सप्टेंबरला अहसान (90 वर्ष) यांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी दिलीप कुमार आणि पत्नी सायरा बानो यांनी 11 ऑक्टोबर रोजी आपल्या 54 लग्न वाढदिवसदेखील साजरे केले नाही.

बातम्या आणखी आहेत...