आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dimple Yadav In The Election Field From Mainpuri Constituency, Latest News And Update

डिंपल यादव पुन्हा निवडणुकीच्या मैदानात:मैनपुरी पोटनिवडणुकीत सपच्या उमेदवार, 2019 मध्ये कन्नौजमध्ये झाला होता पराभव

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डिंपल यादव पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. त्या यावेळी मैनपुरीतून लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार आहेत. सप प्रमुख अखिलेश यादव यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. मुलायम सिंह यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर 5 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

डिंपल 3 वर्षानंतर निवडणुकीच्या आखाड्यात परतणार आहेत. त्यांनी 2019 मध्ये कन्नौजमधून लोकसभा लढवली होती. पण त्यात त्यांचा पराभव झाला होता. 44 वर्षीय डिंपल 5व्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या आहेत. समाजवादी पार्टीने मैनपुरीमधून उमेदवारी देण्याच्या मुद्यावर डिंपलसह तेजप्रताप यादव व धर्मेंद यादव यांच्या नावावर विचार केला. पण अखेर डिंपल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

कन्नौजहून 2 वेळा खासदार

डिंपल यादव यांचा पुण्यात 15 जानेवारी 1978 रोजी जन्म झाला. त्या कन्नौजहून दोनवेळा लोकसभेवर पोहोचल्या. त्यांचे कुटुंब मूळचे उत्तराखंडचे आहे. त्यांचे वडील रिटायर कर्नल आहेत. डिंपल 3 बहिणींत दुसऱ्या क्रमांकाच्या आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण सैनिकी शाळेत झाले. त्यांचे आई-वडील उत्तराखंडच्या काशीपूरमध्ये राहतात. डिंपल यांचा अखिलेश यांच्यासोबत प्रेमविवाह झाला होता.

2009 मध्ये लढवली होती फिरोजाबाद पोटनिवडणूक

डिंमपल यांनी 2022 च्या विधानसभा निवडणुकीत सप उमेदवारांसाठी प्रचार केला होता.
डिंमपल यांनी 2022 च्या विधानसभा निवडणुकीत सप उमेदवारांसाठी प्रचार केला होता.

अखिलेश यादव यांनी 2009 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद व कन्नौज या मतदार संघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर अखिलेश यांनी फिरोजाबाद मतदार संघ सोडला. तेथून त्यांनी डिंपल यांना उमेदवारी दिली. पण त्यांचा काँग्रेसच्या राज बब्बर यांनी पराभव केला.

2012 मध्ये कन्नौजमधून उमेदवारी

अखिलेश यादव यांनी कन्नौज लोकसभा मतदार संघ सोडल्यानंतर 2012 मध्ये पोटनिवडणूक झाली. सपने यावेळीही डिंपल यादव यांच्यावर विश्वास दाखवला. या निवडणुकीत बसप, काँग्रेस व भाजपने त्यांच्याविरोधात उमेदवार दिला नाही. त्यानंतर 2 उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे डिंपल बिनविरोधात लोकसभेवर पोहोचल्या. 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीतही त्यांनी सपचा कन्नौजचा गड राखला होता. त्यानंतर यंदाही त्यांना पक्षाने कन्नौजहून उमेदवारी दिली आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत डिंपल हिट प्रचारक ठरल्या

यामागे यंदाच्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचे कारण होते. डिंपल यादव निवडणुकीत हिट प्रचारक ठरल्या. सप प्रमुख अखिलेश यादव यांनी त्यांना शेवटच्या टप्प्यात प्रचारासाठी मैदानात उतरवले होते. त्याचा सपला अनेक जागांवर फायदाही झाला होता. कौशांबी व जौनपूरमधील त्यांच्या प्रचारसभांमुळे या भागातील केवळ एका जागेवर भाजपचा विजय झाला होता. तो ही अत्यंत कमी मार्जिनने.

बातम्या आणखी आहेत...