आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Dinesh Trivedi BJP Joining Update | Mamata Banerjee TMC Party MP Dinesh Trivedi Join BJP In Presence JP Nadda Piyush Goyal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंगाल निवडणुकांपूर्वी ममतांना धक्का:दिनेश त्रिवेदींचा BJP मध्ये प्रवेश, नड्डा म्हणाले - 'योग्य व्यक्ती चुकीच्या पक्षात होती'

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 12 फेबुवारीला दिला होता राजीनामा

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांपूर्वीच ममता सरकारला मोठा धक्का बसला आहे. TMC चे माजी राज्यसभा खासदार आणि ममता बॅनर्जींचे निकटवर्तीय दिनेश त्रिवेदी यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्रिवेदी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत पक्षात सामिल झाले आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्री पियूष गोयलही यावेळी उपस्थित होते.

12 फेबुवारीला दिला होता राजीनामा
त्रिवेदी यांना ममता बॅनर्जी यांचा जवळचा नेता मानले जाते. 12 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी स्वतःचा राजीनामा जाहीर केला. गेल्या दोन महिन्यांपासून ते तृणमूल कॉंग्रेसपासून दूर होते. टीएमसीने त्रिवेदींच्या निर्णयाला पक्ष आणि जनतेचा विश्वासघात म्हटले होते.

'खेळ' खेळता-खेळता ममता आपल्या आदर्श विसरल्या : त्रिवेदी
भाजपमध्ये सामिल झाल्यानंतर त्यांनी म्हटले की, बंगालची जनता तृणमूल काँग्रेसला नाकारले आहे. राज्याच्या जनतेला विकास पाहिजे, त्यांना हिंसा आणि भ्रष्टाचार नको आहे. राजकारण काही 'खेळ' नसतो, ही एक गंभीर चीज आहे. खेळता-खेळता त्या (ममता बॅनर्जी) आपल्या आदर्श विसरल्या.

त्रिवेदी योग्य व्यक्ती, चुकीच्या पक्षात होती : नड्डा
तर नड्डा यांनी म्हटले की, जेव्हा मी त्रिवेंदींविषयी बोलायचो, तेव्हा नेहमी म्हणायचो की, ते एक चांगले व्यक्ती आहेत, मात्र चुकीच्या पक्षामध्ये आहेत. असे त्यांना स्वतःलाही वाटत होते. आता योग्य व्यक्ती योग्य पक्षात आली आहे, येथे आम्ही नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाचा त्यांचा उपयोग देशाच्या सेवेत करु शकू.

बातम्या आणखी आहेत...