आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पश्चिम बंगाल:दिनेश त्रिवेदींमुळे 70 हिंदी भाषिक जागांवर भाजपला होईल फायदा

धर्मेंद्रसिंह भदौरिया | नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिनेश त्रिवेदी तृणमूलच्या हिंदीभाषी सेलचे अध्यक्ष आणि दिल्लीत पक्षाचा चेहरा होते

माजी केंद्रीय मंत्री व तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिनेश त्रिवेदी यांनी अचानक तृणमूल काँग्रेस सोडणे ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ते भाजपत जाण्याची चर्चा आहे. राजकीय विश्लेषकांनुसार त्रिवेदी भाजपत गेल्यानंतर राज्यातील उच्चभ्रू वर्ग आणि हिंदी भाषिक मतदारांमध्ये पक्षाची पकड आणखी मजबूत होईल. भाजपत गेल्यानंतर त्रिवेदी यांना लवकरच राज्यसभेत पाठवले जाऊ शकते. राज्यातील २९४ विधानसभा मतदारसंघांपैकी ७० ठिकाणी हिंदी भाषिकचा प्रभाव आहे. राजकीय विश्लेषक दिव्यज्योती बसू यांच्यानुसार, त्रिवेदी प्रामाणिक प्रतिमेच्या नेत्यांपैकी एक आहेत. दिल्लीत ते तृणमूल काँग्रेसच्या मोठ्या चेहऱ्यांपैकी होते. तसेच पक्ष निधीची व्यवस्था करण्यातही त्याची भूमिका महत्त्वाची होती.

पश्चिम बंगालच्या हिंदी भाषिक समुदायात त्यांचे वर्चस्व आहे व आतापर्यंत ते तृणमूलच्या हिंदीभाषी सेलचे अध्यक्ष होते. ते भाजपत गेल्यास हिंदी भाषिक व उच्चभ्रू समुदायात पक्षाचे वर्चस्व वाढेल.

त्रिवेदी यांच्या पक्षात येण्याच्या प्रश्नावर भाजपचे सरचिटणीस आणि पश्चिम बंगाल प्रभारी कैलास विजयवर्गीय म्हणाले, ते प्रामाणिक प्रतिमेचे आहेत. त्यांनी राज्यात ममता बॅनर्जी सरकारचा भ्रष्टाचार आणि अन्यायास कंटाळून पक्ष सोडला. जर ते भाजपत आले तर आनंद होईल.

बातम्या आणखी आहेत...