आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Direct Ro ro Packs Ferry Service From Hazira In Surat To The Village Including Dwarka, Mumbai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रो-रो पॅक्स फेरी सेवा:द्वारका, मुंबईसह सुरतच्या हजिरा येथून गाेव्यापर्यंत थेट रो-रो पॅक्स फेरी सेवा; सागरमाला योजनेअंतर्गत काेचीपर्यंतच्या जलमार्गाचा नकाशा तयार

सुरत4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हजिरामध्ये दिसेल जहाजांची रांग, बंदर उभारणीचे काम सुरू

सागरमाला योजनेअंतर्गत केंद्रीय बंदर, नाैकानयन व जलमार्ग मंत्रालय सुरत-हजिरा येथून पिपावाव, दीव, द्वारका, मुंबई आणि गोवा येथे रो-रो पॅक्स सेवा सुरू करणार आहे. यामुळे पर्यटनस्थळांना चालना मिळेल आणि व्यावसायिकांना फायदा होईल. मंत्रालयाने हजिरा, ओखा, द्वारका, दीव, पिपावाव, दहेज, मुंबई, जेएनपीटी, जामनगर, कोची, घोघा, गोवा, मुंद्रा आणि मांडवी बंदरांची निवड केली आहे. यासह बांगलादेशच्या चॅट्टाेग्राम, श्रीलंकेच्या जाफना, पूर्व आफ्रिकेतील सेशल्स आणि मादागास्कर बंदराचीही निवड झाली आहे. गाेव्याची राे-राे पॅक्स मंगलाेरवरून काेचीपर्यंत जाणार आहे.

हजिरामध्ये दिसेल जहाजांची रांग, बंदर उभारणीचे काम सुरू

केंद्रीय जहाजबांधणी राज्यमंत्री मनसुख मंडाविया म्हणाले, येत्या काही दिवसांत हजिरा बंदरावर जहाजांची लांबलचक रांग दिसेल. मंत्रालय लवकरच नवीन रो-रो पॅक सेवा सुरू करणार आहे. हजिरा ते गोवा शटल फेरी मंगलोर व कोचीपर्यंत जाईल. मंत्रालयाने याचा प्रस्ताव मागवला आहे. बंदर उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे. दक्षिणेकडून ट्रक जहाजामार्गे थेट हजिरा बंदरात उतरतील.

रो-रो पॅक्सचे फायदे असे

> पर्यटन स्थळांना चालना मिळेल

> शहरातील व्यवसायाला गती मिळेल

> प्रवासाची वेळ कमी होईल

> रस्ते अपघात टळतील

> टोल करासह खर्च वाचेल

> मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होईल

> वातावरणही स्वच्छ हाेईल

> जलमार्गाने प्रवास सुकर होईल

बातम्या आणखी आहेत...