आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Disciplinary Proceedings By DOPt Against Bengal CS If He Does Not Join On Central Deputation | Central Govt |Narendra Modi Vs Mamata Banerjee

ममता vs मोदी सरकार:दिल्लीत दाखल झाले नाहीत बंगालचे मुख्य सचिव, ममता म्हणाल्या- बंधोपाध्याय यांना रिलीव्ह करणार नाही

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्य सचिव अलापन बंधोपाध्याय यांच्यावर केंद्र करू शकते कारवाई

पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अलापन बंधोपाध्याय यांच्या बदलीवरुन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्र सरकारमध्ये वाद पेटला आहे. केंद्राने बंगालचे मुख्य सचिव अलापन बंधोपाध्याय यांना सोमवारी सकाळी 10 वाजेपर्यंत दिल्लीत हजर राहण्यास सांगितले होते. पण, अलापन अद्याप दिल्लीत दाखल झाल्याची कुठलीही माहिती मिळालेली नाही. यामुळे केंद्र सरकार अलापन यांच्यावर कारवाई करू शकते. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना पाच पानांचे पत्र लिहून अलापन यांना रिलीव्ह करणार नसल्याचे म्हटले आहे.

ममतांचे मोदींना पत्र
अलापन यांच्या बदलीविरोधात ममता यांनी मोदींना पत्र लिहून मुख्य सचिवांना रिलीव्ह करणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच, ममतांनी बदलीच्या आदेशाला एकेरी म्हटले. ममता आपल्या पत्रात म्हणाल्या की, सध्या कोरोनामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. अशा नाजुक परिस्थितीत आम्ही आमच्या मुख्य सचिवांना रिलीव्ह करणार नाहीत. आम्ही आमचा परस्पर समन्वय, लागू केलेले कायदे आणि योग्य सल्लामसलत यांच्या आधारे त्यांची सेवा वाढवण्याचा निर्णय घेतला होता.

आपल्या पत्रात त्यांनी केंद्र सरकारच्या आदेशास पूर्णपणे घटनाबाह्य, कायदेशीरदृष्ट्या अस्थिर म्हटले. तसेच, कलाईकुंडाचा उल्लेख करत, या बदलीमागे कलाईकुंडामधील बैठकीचा संबंध आहे का ? असा प्रश्नही विचारला.

मोदींच्या बैठकीला उशीरा पोहोचले होते बंधोपाध्याय

याच चक्रीवादळामुळे आलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी बंगालमध्ये दाखल झालेह होते. यावेळी बोलवण्यात आलेल्या बैठकीत अलापन उशीरा दाखल झाले. या बैठकीच्या काही तासातच त्यांची दिल्लीत बदली करण्यात आली.

दरम्यान, निवृत्त अधिकारी आणि कायद्याचे जानकार सांगतात की, मोदी सरकारने भलेही मुख्य सचिवांची दिल्लीत बदली केली असेल. पण, हा आदेश लागू करणे अवघड आहे. त्यांना रिलीव्ह करणे राज्याच्या अधिकारात आहे. त्यामुळे ममता त्यांना दिल्लीत पाठवण्यास नकार देत आहेत.

बातम्या आणखी आहेत...