आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Discontent In Government Due To RBI's Failure; Inflation Can Be Controlled | Marathi News

महागाई-बेरोजगारी:आरबीआयच्या अपयशामुळे सरकारमध्ये नाराजी; महागाईवर नियंत्रण शक्य होते

नवी दिल्ली / अवनीश जैनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महागाई व बेरोजगारीवर नियंत्रण मिळवण्यात रिझर्व्ह बँक अपयशी ठरल्याने सरकारमध्ये नाराजी आहे. रिझर्व्ह बँकेच्या स्पष्टीकरणाने केंद्र सरकार समाधानी नाही. असे म्हटले जात आहे की, रिझर्व्ह बँकेने व्याजदरांबाबत वेळेपूर्वीच निर्णय घेतला असता तर महागाईवर नियंत्रण मिळवता आले असते.

सूत्रांनुसार, रिझर्व्ह बँकेने निर्णय घेण्याचा वेग वाढवायला हवा होता. सरकारने महागाई दराचे उद्दिष्ट ६ टक्क्यांखाली निश्चित केले होते, पण केंद्रीय बँक हे उद्दिष्ट साध्य करू शकली नाही. असे म्हटले जात आहे की, बेरोजगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी व्याजदर कमी ठेवले आहेत. व्याजदर वाढले तर रोजगार घटला असता. दुसरीकडे सरकारनुसार, महागाईमुळे गुजरात, हिमाचल निवडणुकीवर परिणाम होत आहे. तसेच देशातही नकारात्मक वातावरण तयार होत आहे. आधीपासूनच रिझर्व्ह बँक व सरकारमध्ये धोरणांवरून वाद आहेत. आधीही रघुराम राजन व ऊर्जित पटेल यांच्या काळात मतभेद होते. तथापि, सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दाससोबत तुलनात्मकरीत्या सरकारचे संबंध चांगले आहेत.

चलनविषयक समिती सदस्यांना बोलण्यास बंदी रिझर्व्ह बँकेने चलनविषयक समिती सदस्यांवर चलनविषयक धोरणाच्या बैठकीनंतर व आधी बोलण्यास बंदी घातली आहे. असे म्हटले जात आहे की, समिती सदस्य बैठकीच्या ७ दिवस आधी व ७ दिवसांनंतर कोणत्याच विषयावर बोलू शकणार नाहीत. बैठकीच्या ७ दिवसांनंतरही ते वैयक्तिक विचारच मांडू शकतील. बैठकीचा अजेंडा, इतिवृत्त आदी मुद्द्यांवरील माहिती केवळ अधिकृतरीत्याच जाहीर केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...