आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ममता बॅनर्जी - मोदी भेटीचा फोटो जारी:ममता-पंतप्रधान मोदी यांच्यात थकबाकीच्या मुद्द्यावर चर्चा

नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संसदेचे अधिवेशन सुरू असतानाच दिल्लीत आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी राज्याच्या वाट्याची जीएसटीची थकबाकी तसेच इतर निधी वेळेवर द्यावा, अशी विनंती केली. पीएमओने १ तास चाललेल्या या भेटीचा फोटो जारी केला.

ममतांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेतली. पश्चिम बंगाल सरकार बऱ्याच काळापासून केंद्राकडील आपली थकबाकी द्यावी, अशी मागणी करत आहे. ममतांनी मनरेगा, पंतप्रधान आवास आणि पंतप्रधान ग्रामीण रस्ते योजनेतील राज्याच्या कोट्यातील १७,९९६.३२ कोटी रुपये देण्याची मागणी केली. ममतांनी विविध योजनांतर्गत राज्य सरकारच्या १,००,९६८.४४ कोटी रुपयांच्या थकबाकीचा मुद्दाही उपस्थित केला. ममता चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आल्या आहेत. त्या नीती आयोगाच्या बैठकीलाही उपस्थित राहतील.

बातम्या आणखी आहेत...