आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Discussion On Corona Virus | PM Modi Interacts With Bill Gates, Discusses Global Response To COVID 19

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनावर चर्चा:मोदींनी बिल गेट्सकडून मागितल्या सूचना - जगाच्या हितासाठी भारत कसे चांगले काम करू शकेल?

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोरोनावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री उशिरा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे सह-अध्यक्ष बिल गेट्स यांच्याशी चर्चा केली. दोघांमध्ये कोरोनाचा जगावर होणाऱ्या परिणामाबद्दल जवळपास अर्धा तास चर्चा झाली. यावेळी वैज्ञानिक नाविन्य आणि संशोधन आणि विकास या विषयावर देखील बोलणे झाले. 

यावेळी मोदींनी गेट्स फाउंडेशनच्या केवळ भारतातच नाही तर जगातील इतर ठिकाणी केले जाणाऱ्या आरोग्यविषयक कार्यांचे कौतुक केले. जगाच्या हितासाठी भारताच्या क्षमतांचा अधिकाधिक उपयोग कसा करता येईल या संदर्भात त्यांनी बिल गेट्सकडे सूचना मागविल्या.

मोदींनी सरकारच्या कामांविषयीची दिली माहिती

पंतप्रधानांनी या चर्चेत सरकारच्या कामांचा उल्लेख केला. या साथीच्या काळात भारतातील आरोग्य सेवा कशा मजबूत केल्या जात आहेत याबाबत त्यांनी सांगितले. याशिवाय लोकांची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेद औषधे देखील वापरली जात आहेत. स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे. ते म्हणाले की या सर्व गोष्टींमुळे भारताला कोरोना साथीच्या लढाईत बळ मिळालं आहे.

मोदींनी गेट्स यांना सांगितले की, भारतीयांनी सोशल डिस्टन्सिंगचा स्वीकार केला आहे. सोबत मास्क घालण्यापासून लॉकडाउनच्या नियमांचे पालन करण्यापर्यंत लोकांचे सहकार्य मिळाले आहे. यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यात काही प्रमाणात यश आल्या मोदींनी सांगितले. 

बिल गेट्स म्हणाले- कोरोना युद्धात भारताची भूमिका महत्त्वाची 

मोदींनी चर्चा केल्याबद्दल बिल गेट्स यांनी त्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, कोरोनाशी लढण्यासाठी जागतिक भागीदारी आवश्यक आहे. सामाजिक आणि आर्थिक प्रभाव कमी करण्यात आणि सर्वांसाठी लसी, चाचणी आणि उपचार उपलब्ध करण्यात भारताची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.

बातम्या आणखी आहेत...