आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीत 21 अल्पवयीन मुलांनी इन्स्टाग्राम चॅट ग्रुप तयार केला. या ग्रुपमध्ये सामुहिक बलात्कार आणि लैंगिक हिंसाचारासह अनेक गुन्हेगारी गोष्टींविषयी चर्चा केली जात असल्याचा आरोप आहे. रविवारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सायबर सेल सक्रिय झाले. वृत्तसंस्थेनुसार या ग्रुपमध्ये एकूण 21 मुले असून या सर्वांची ओळख पटली आहे. एका आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की या ग्रुपमध्ये सुमारे 100 सदस्य आहेत. दिल्ली महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. पोलिसांकडून 8 मे पर्यंत उत्तर मागितले आहे.
रविवारी झाला होता खुलासा
रिपोर्ट्सनुसार, रविवारी या प्रकरणाचा खुलासा झाला. आता हा ग्रुप डी-अॅक्टीव्हेट झाला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मुलाचा मोबाइल जप्त केला आहे. माहितीनुसार, बहुतांश आरोपी 11वी आणि 12 वीचे विद्यार्थी असून दिल्लीतील चार किंवा पाच नामांकित शाळांचे विद्यार्थी आहेत. या गटात बलात्कार आणि लैंगिक हिंसाचारावर अत्यंत आक्षेपार्ह आणि गुन्हेगारी प्रवृत्तीची चर्चा केल्याचा आरोप आहे.
फेसबुककडून माहिती मागवली
सायकल सेलने फेसबुकला पत्र लिहून त्यांना या ग्रुपची सर्व माहिती लवकरच देण्यास सांगितले आहे. इन्स्टाग्रामचा मालकी हक्क फेसबुककडे आहे. रविवारी सोशल मीडियावरील काही यूजर्सनी या ग्रुपमध्ये केल्या जात असलेल्या चर्चांचे स्क्रीनशॉट शेअर केले. या ग्रुपमध्ये जवळपास 100 सदस्य असल्याचा दावा केला जात आहे. एका मुलीने देखील चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. ग्रुपमधील एखाद्या सदस्याने तिला मेसेच पाठविला असा आरोप आहे. गप्पांमधील काही गोष्टी इतक्या आक्षेपार्ह होत्या की, त्या लिहिताही येत नाहीत.
विद्यार्थिनीने दिली तक्रार
एका मीडिया रिपोर्टनुसार, 19 वर्षीय एका विद्यार्थिनीने या ग्रुपमध्ये स्वतःचा फोटो पाहिला. यानंतर तिने याबाबत शाळेत तक्रार केली. या विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर शाळेने पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर दिल्ली पोलिसांचा सायबर सेल सक्रिय झाला.
दिल्ली पोलिसांनी काय म्हटले?
सायबर सेलच्या एका अधिकाऱ्याने दिल्ली पोलिसांनी सांगितले की, बॉइज लॉकर रूम ग्रुपच्या एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. सर्व 21 ग्रुप मेंबर्सची ओळख पटली असून सर्वांची चौकशी केली जाणार आहे.
असे आले प्रकरण उघडकीस
मागील काही दिवसांपासून काही इंस्टाग्राम यूजर्सनी या ग्रुपच्या कृत्यांवर लक्ष ठेवले होते. तसेच यावर आपली नाराजीही दर्शवली होती. काहींनी ग्रुपचे स्क्रीनशॉट शेअर केले आणि ते व्हायरल झाले. यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.