आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापूर्व लडाखमध्ये एकमेकांसमोर तैनाती असलेल्या दोन ठिकाणचा तणाव संपवण्याच्या प्रयत्नांतर्गत भारत आणि चीनी लष्कराच्या प्रमुख कमांडर्समध्ये याच महिन्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. जी-२० च्या बैठकीला हजर राहण्यासाठी आलेले चीनी परराष्ट्रमंत्री छिंग कांग यांनी नुकतीच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. यात एलएसीच्या उर्वरित फ्रिक्शन पॉइंट्सवर उपाय शोधण्यासाठी लवकरच लष्करी कमांडर्स चर्चा करण्यास सहमती झाली आहे. लष्करी कमांडर्समधील ही चर्चा मार्चच्या तिसऱ्या किंवा अखेरच्या आठवड्यात होईल. यात १७व्या फेरीच्या चर्चेचा फॉर्म्युला पुढे नेण्यात येईल.
चीनच्या एससीओच्या बैठकीसाठी वातावरण निर्मितीची योजना : एलएसीवरील तणाव संपवण्यासाठी जी-२० किंवा शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीपैकी कोणत्याही एकामध्ये राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या उपस्थितीसाठी योग्य वातारवण निर्मितीची योजना आहे. भारत आणि चीनमध्ये चांगले संबंध निर्माण व्हावेत, असे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना वाटते. प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मोदी, पुतीन आणि जिनपिंग यांची एकजूट दिसावी, अशी त्यांची इच्छा आहे.
भारत भूमिकेवर ठाम
लष्करी कमांडर्सच्या चर्चेच्या आधारेच सैनिकांना माघारी बोलावले जात होते. पँगाँगचे उत्तर व दक्षिण टोक आणि हॉट स्प्रिंग, गोगरामधील एकमेकांसमोरील तैनाती याच बैठकांमध्ये झालेल्या सहमतीने हटवण्यात आली होती. आता देपसांग आणि देमचौकमधील दोन फ्रिक्शन पॉइंट्समधून लष्कराने माघार घेणे व त्यानंतर लडाख क्षेत्रात दोन्हीकडील सैनिकांची संख्या कमी करणे, या दिशेने पावले उचलण्याची प्रतीक्षा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.