आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Discussions At The Lieutenant General Level Today On The Withdrawal Of Troops From East Ladakh

भारत-चीन सीमावाद:पूर्व लडाखमधून सैन्य मागे घेण्याबाबत लेफ्टनंट जनरल पातळीवर आज चर्चा

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एलएसीवर भारतातील चुशूलमध्ये बैठक होण्याची शक्यता

पूर्व लडाखमधून सैन्य माघारी घेण्याच्या पुढील टप्प्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी भारत आणि चिनी सैन्यादरम्यान आज लेफ्टनंट जनरल पातळीवरील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होईल. लष्करी सूत्रांनी सोमवारी ही माहिती दिली. एलएसीवरील भारतातील चुशूलमध्ये ही बैठक होण्याची शक्यता आहे. चीनने गोगरा, हॉट स्प्रिंग्स आणि गलवान खोऱ्यातून आपले सैन्य माघारी घेतले आहे. तसेच पँगोंग त्सो भागात फिंगर ४ वरही सैनिकांची संख्या कमी केली आहे. चीनने फिंगर ४ आणि ८ मधील क्षेत्रातील सैन्य माघारी घ्यावे, अशी भारताची मागणी आहे. सूत्रांनुसार, लडाख क्षेत्रात एलएसीसह सर्वच क्षेत्रांवर भारत बारीक नजर ठेवून आहे. दिल्लीत सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही या क्षेत्रातील स्थितीकडे २४ तास लक्ष आहे.लष्करप्रमुख जनरल नरवणेंनी जम्मू-पठाणकोट सेक्टरचा दौरा केलालष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी सोमवारी जम्मू-पठाणकोट सेक्टरचा दौरा केला. यावेळी त्यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी गुर्ज विभागाचीही पाहणीही केली. जनरल नरवणे यांनी सैन्याचे अधिकारी आणि जवानांना पाकिस्तानकडून युद्धबंदीचे होणारे उल्लंघन आणि घुसखोरीच्या प्रयत्नांना सडेतोड उत्तर देण्याचे निर्देश दिले. ते म्हणाले, सरकार आणि संबंधित सर्व संस्था सीमेकडून होणाऱ्या राष्ट्रविरोधी कृत्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी एकजुटीने काम करत आहे. यापुढेही करत राहील. दरम्यान, पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात दहशतवादी भारतीय सीमेत घुसण्याच्या प्रयत्नात असल्याची शक्यता गुप्त अहवालात वर्त‌वण्यात आली आहे.