आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Discussions With Three Countries For International Flights Continue; Service To The United States From 17, France From 18 July

विमान सेवा:आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी तीन देशांसाेबत चर्चा सुरू; 17 पासून अमेरिका, 18 जुलैपासून फ्रान्सची सेवा

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वंदे भारत मिशन व इतर माध्यमांनी 6.87 लाखांपेक्षा जास्त लोकांना देशात आणले

सरकार आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करणार आहे. मात्र, ती नियमित नसतील. नागरी उड्डयणमंत्री हरदीप पुरी म्हणाले, २३ मार्चपासून बंद असलेली आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी फ्रान्स, अमेरिका व जर्मनी या तीन निवडक देशांसोबत चर्चा सुरू आहे. एअर बबलअंतर्गत एअर फ्रान्स १८ जुलै ते १ ऑगस्टदरम्यान दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू ते पॅरिससाठी २८ उड्डाणे संचालित करेल. तसेच अमेरिकेच्या युनायटेड एअरलाइन्ससोबत १७ ते ३१ जुलै १८ उड्डाणे सुरू करण्यासाठी आम्ही करार केला आहे. सध्या हा करार तात्पुरता आहे.

६.८७ लाखांपेक्षा जास्त लोकांना देशात आणले

वंदे भारत मिशन व इतर माध्यमांनी आतापर्यंत देशात ६ लाख ८७,४६७ भारतीयांना देशात परत आणल आहे. याआधी १९९० मध्ये १.७ लाख भारतीयांना कुवेतमधून काढण्यात आले होते. आता एअर इंडियाने ५३ देशांतून सुमारे ७ लाख भारतीयांना विदेशातून देशात आणले आहे.