आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Disha Ravi In Delhi High Court, Case Of Leaking Investigation Information In Media

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टूलकिट प्रकरण:दिशा रवी दिल्ली हायकाेर्टात, माध्यमांत तपासाची माहिती लीक झाल्याचे प्रकरण

नवी दिल्ली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टूलकिट प्रकरणात अटकेतील २१ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवीने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यात तिने मागणी केली की, तपासाशी संबंधित माहिती, व्हॉट्सअॅपवर चॅट आदी तिसऱ्या पक्षाला लीक करण्यात येऊ नये. याचिकेत दिशाने म्हटले आहे की, काही वृत्तवाहिन्या पक्षपाती वृत्तांकन करत आहेत. यात न्यूज-१८, इंडिया टुडे आणि टाइम्स नाऊसह अनेक वृत्तवाहिन्यांचा समावेश आहे. त्यावर हायकाेर्टाच्या न्यायमूर्ती प्रतिभा सिंह यांनी गुरुवारी न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशन (एनबीएसए), न्यूज-१८, टाइम्स नाऊ आदींना नोटिसा बजावल्या आहेत.

दिशाने म्हटले की, दिल्ली पोलिस जाणूनबुजून तपासाची माहिती लीक करत आहेत. कोर्टाने केंद्र सरकारकडूनही उत्तर मागवले आहे. सर्व पक्षांना याबाबत शुक्रवारपर्यंत उत्तरे देण्यास सांगितले आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांचे वकील तुषार मेहतांनी कोर्टाला सांगितले की, “ही याचिका केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी करण्यात आली आहे. पोलिसांकडून कोणतीही माहिती लीक झालेली नाही. आम्ही शपथपत्र दाखल करणार आहोत.’

बातम्या आणखी आहेत...