आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Disinfectant Sprays Harmful To Health, Government Will Ban; Notification Coming Soon

कोरोना व्हायरस:जंतुनाशक फवारा आरोग्यास घातक, सरकार आणणार बंदी; लवकरच अधिसूचना

नवी दिल्ली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्र सरकार अधिसूचना जारी करून अशा निर्जंतुकीकरण कक्षांचा वापर करणे थांबवण्यास सांगणार आहे

देशभरात बऱ्याच ठिकाणी कोरोनापासून बचावासाठी निर्जंतुकीकरण कक्षात अंगावर जंतुनाशकांचा फवारा मारला जातो. मात्र, असे करणे आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे सांगत केंद्र सरकार त्यावर लवकरच बंदी आणणार आहे. सुप्रीम कोर्टाला सोमवारी ही माहिती देत सरकार म्हणाले की, याबाबत लवकरच अधिसूचना जारी केली जाईल.

गुरसिमरनसिंह नरूला यांनी सुप्रीम कोर्टात पीआयएल दाखल करून कर डिसइन्फेक्शन टनेलवर बंदीची मागणी केली होती. सोमवारी सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, विमानतळ, रेल्वेस्थानके, शॉपिंग मॉल व इतर जागी सॅनिटायझर व जंतुनाशकांचा फवारा मारल्याने लोकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात येऊ शकते असे विविध आरोग्य संस्थांच्या संशोधनात आढळले आहे. लवकरच केंद्र सरकार संबंधित संस्थांना अधिसूचना जारी करून अशा निर्जंतुकीकरण कक्षांचा वापर करणे थांबवण्यास सांगणार आहे.