आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायमूर्तींवर निशाणा साधण्याची एक मर्यादा:आम्हालाही थोडा ब्रेक द्या; न्यायपालिकेवरील टीकेवर न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांची नाराजी

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वाेच्च न्यायालयातील एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्या.डी.वाय.चंद्रचूड यांनी प्रसारमाध्यमांतील कठोर टिप्पणीवर नाराजी व्यक्त केली म्हटले की, न्यायमूर्तींवर निशाणा साधण्याची एक मर्यादा असते.न्यायमूर्तींकडून सुनावणी न करण्याशी संबंधित वृत्तावर त्यांनी ही टिप्पणी केली. एका वकिलाने ख्रिश्चनांविरुद्ध हिंसाचार आणि हल्ल्यांविरुद्ध दाखल प्रकरणावर सुनावणी घेण्याची विनंती केली होती.

न्या. चंद्रचूड म्हणाले, हे प्रकरण सुनावणीसाठी घेतले नसल्याचे वृत्त वाचले होते. आम्हा न्यायमूर्तींनाही थोडा ब्रेक द्या. गेल्या वेळी कोरोनामुळे मी सुटीवर होतो,त्यामुळे सुनावणी होऊ शकली नाही. नॅशनल सॉलिडेरिटी फोरम, द इव्हेंजेलिकल फेलोशिप ऑफ इंडियाचे व बंगळुरू डायोसीजचे आर्चबिशप डॉ. पीटर मचाडो यांनी ही याचिका दाखल केली. यात ख्रिश्चनांवरील वाढते हल्ले व चौकशीच्या आदेशाची विनंती केली आहे.

बातम्या आणखी आहेत...