आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dispute Between Karnataka And Andhra Pradesh On The Eve Of Elections, Issue Like 'Ayodhya In The South' Possible For BJP|Marathi News

हनुमान जन्मस्थळ भाजपचा नवा मुद्दा:निवडणुकीच्या तोंडावरच कर्नाटक व आंध्र प्रदेश यांच्यात वाद, भाजपसाठी हा ‘दक्षिणेतील अयोध्या’सारखा मुद्दा शक्य

बंगळुरू4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकात विधानसभेची निवडणूक २०२३ मध्ये प्रस्तावित आहे. परंतु कर्नाटकात नोव्हेंबर, तर गुजरातेत २०२२ मध्ये म्हणजे नियोजित वेळेआधी निवडणूक होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळते. भाजपने राज्यात हिंदुत्वावरून रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक-आंध्र प्रदेशात भगवान हनुमानाच्या जन्मस्थळावरून वाद वाढला आहे. त्याला निवडणूक मुद्दा बनवण्याची तयारी दिसते. भाजपसाठी हा ‘दक्षिण अयोध्या’सारखा मुद्दा ठरेल, असे पक्षाच्या रणनीतिकारांना वाटते. या मुद्द्यावरून कर्नाटकात पुन्हा सत्ता मिळवता येईल. त्याशिवाय त्याद्वारे अँटी इन्कम्बसीलादेखील कमी होऊ शकते.

मुख्यमंत्री बोम्मईंनी अंजनाद्री विकासासाठी १०० कोटींचा निधी दिला

13 एप्रिलमध्ये भाजपची प्रदेश शाखा हनुमान जन्मस्थळाला मुद्दा बनवण्यावर अंतिम निर्णय घेऊ शकते.

विरोधही : विहिंपचा पाठिंबा नाही

हनुमान जन्मस्थळाला निवडणूक मुद्दा बनवण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचा पाठिंबा दिसत नाही. विहिंपचे संघटनमंत्री बसवराज म्हणाले, या मुद्द्यामुळे हिंदू समाजाचे क्षेत्रीय पातळीवर विभाजन होण्याची शक्यता वाटते. आंध्र प्रदेशातील हिंदू मतदार नाराज होऊ शकतात.

आणखी एक मुद्दा : हिजाब, मुस्लिम विक्रेत्यांच्या हद्दपारी मुद्द्यांचाही लाभ

कर्नाटकात अलीकडेच हिजाबच्या मुद्द्यावरून भाजपला राजकीय लाभ मिळाला. सोबतच कर्नाटकात हलाल मीटची विक्री, हिंदू मंदिरांतील जत्रेत मुस्लिम विक्रेत्यांना हद्दपार करणे, लव्ह जिहादच्या मुद्द्यावरही भाजपला पूर्वी लाभ मिळाला आहे. हनुमानाच्या जन्मस्थळाचा मुद्दा मिळाल्याने भाजपच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

लाभावर लक्ष : आंध्र प्रदेशात भाजपसाठी राजकीय आधार कमी

भाजपच्या रणनीतिकारांच्या म्हणण्यानुसार आंध्र प्रदेशविरोधात हनुमान जन्मस्थळाचा मुद्दा उचलल्यास कर्नाटकात लाभाची जास्त शक्यता आहे. आंध्र प्रदेशात अजूनही भाजपची पाळेमुळे पक्की नाहीत. कर्नाटकातील चिकमंगळुरूमध्ये दत्तात्रय पेटाच्या मुद्द्यावर भाजपने हिंदुत्वाच्या मागण्यांचे समर्थन करून मलनाडमध्ये अनेक जागी विजय मिळवला.

बातम्या आणखी आहेत...