आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Disputes Over Late Arrival On Duty; A BSF Jawan Shot At A Sub inspector, Then Shot Himself

राजस्थान:ड्यूटीवर उशीरा पोहचण्यावरुन वाद; बीएसएफ जवानाने सब इंस्पेक्टरवर झाडल्या गोळ्या, नंतर स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या

जोधपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्रीगंगानगर सेक्टरमधील रेणुका पोस्टची घटना, भारत-पाक सीमेवर तैनात होता बीएसएफ हवलदार

श्रीगंगानगर सेक्टरमधील भारत-पाक सीमेवर तैनात बीएसएफच्या एका हवलदाराने आज(दि.3) सकाळी ड्यूटीवर उशीरा पोहचण्यावरुन झालेल्या वादात सब इंस्पेक्टरवर गोळी झाडली. यानंतर स्वतः केली आत्महत्या. घटनेत दोघांचाही घटनास्थळावर मृत्यू झाला. लॉकडाउनपूर्वीच सुट्टीवरुन परतलेला जवान आपल्या मुलीच्या लग्नात होत असलेल्या विलंबामुळे तणावात असल्याचे सांगितले जात आहे.

जोधपूरमधील राजस्थान सीमांत मुख्यालयाती अधिकाऱ्यांनी सांगितले की, झारखंडचा रहिवासी शिवचरण दास श्रीगंगानगर सेक्टरमधील रेणुका पोस्टवर तैनात होता. रविवारी सकाळी पोस्ट कमांडेट सब इंस्पेक्टर उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले आरपी सिंहने ड्‌यूटीवर उशीर आल्यामुळे शिवचरण यांना फटकारले. यामुळे नाराज शिवचरणने आपल्याकडील बंदुकीतून सिंह यांच्यावर अनेक गोळ्या झाडल्या. त्यानंतर स्वतःवरही गोळी मारुन आत्महत्या केली.

मुलीच्या लग्नातील विलंबामुळे तणावात होता जवान

मिळालेल्या माहितीनुसार बटालियानच्या सीओने मागच्या आठवड्यातच या पोस्टचा दौरा केला होता. यादरम्यान त्यांनी सर्व जवानांकडून त्यांच्या वयक्तिक समस्या विचारल्या होत्या. त्यावेळेस शिवचरण दास यांनी त्यांच्या मुलीचे लग्न ठरत नसल्याचे म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...