आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानमस्कार,
दिव्य मराठीच्या मॉर्निंग न्यूज ब्रिफमध्ये आपले स्वागत आहे. आज शनिवार ४ मार्च असून फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. पाहुयात आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी.
छत्रपती संभाजीनगरसह, नाशिक, जळगावात पावसाची शक्यता
छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार, धुळे, पुणे आणि जालन्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने यांनी ४ ते ७ मार्चसाठी हा इशारा दिला आहे. त्यानुसार, पुढील ४-५ दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी, हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, ३ मार्चला अकोला जिल्हा राज्यात सर्वाधिक उष्ण ठरला. येथे पारा ३.० अंशांनी वाढल्याने कमाल तापमान ३८.२ अंश नाेंदवण्यात आले. वाचा सविस्तर
ला निनाचा काळ संपतोय, उष्णता वाढणार
जागतिक हवामान विज्ञान संघटनेने जागतिक तापमानात वाढ होण्याचा इशारा दिला आहे. यासोबत ला निनानंतर पुढे उष्णता वाढवणारा अल निनो विकसित होऊ शकतो. यामुळे पावसाच्या पॅटर्नवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पर्यावरणाच्या मुद्द्यावर काम करणाऱ्या डाऊन टू अर्थच्या अहवालात अल निनो ३ वर्षांनंतर खूप असामान्य हवामानाचा टप्पा पूर्ण करत आहे. यामुळे जगाच्या हवामानावर खूप परिणाम होऊ शकतो असे नमूद केले आहे. अल निनोच्या घटनेदरम्यान प्रशांत प्रदेशातील पूर्व देश ज्यात ऑस्ट्रेलिया, फिलिपाइन्स, थायलंड, मलेशिया, चीन आदींचा समावेश आहे. वाचा सविस्तर
सरळसेवा भरतीसाठी दाेन वर्षांची मुभा
शासन सेवेत सरळसेवेने भरतीसाठी कमाल वयोमर्यादेत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतच्या जाहिरातींसाठी दोन वर्षांची शिथिलता देण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा सामान्य प्रशासन विभागाचे कामकाज सांभाळणारे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत व मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केले. या निर्णयामुळे सरळसेवेने शासकीय सेवेत येऊ इच्छिणाऱ्या गट-अ, ब, क व ड (वर्ग १-४) या पदांसाठीच्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ४० व्या वर्षापर्यंत तर मागास प्रवर्गासाठी उमेदवारांना ४५ व्या वर्षापर्यंत नोकरीची संधी असणारा आहे. वाचा सविस्तर
शिंदे - फडणवीस सरकारला खंडपीठाचा झटका
ठाकरे सरकारने अर्थसंकल्पात मंजूर केलेल्या विकासकामांना सत्तांतरानंतर शिंदे सरकारने स्थगिती दिली होती. मात्र ही कामे थांबवता येणार नाहीत. कार्यारंभ आदेश दिलेली कामे पूर्णत्वास न्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील व न्या. संतोष चपळगावकर यांनी शुक्रवारी दिले. त्यामुळे आता मराठवाड्यातील ५ तालुक्यांतील सुमारे २०८ कोटींच्या कामांवरील स्थगिती उठण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मविआ सरकारमध्ये अनेक कामांना प्रशासकीय मान्यता देऊन कार्यारंभ आदेशही देण्यात आले होते. मात्र जुलैमध्ये सत्तांतरांनंतर शिंदे सरकारने या सर्व निर्णयांना स्थगिती देऊन निधीही थांबवला होता. वाचा सविस्तर
गुजरात-मुंबई आज महिला IPL सामना
पहिल्या सत्राच्या महिला प्रीमियर लीगला शनिवारपासून सुरुवात हाेत आहे. याच लीगच्या माध्यमातून आता महिलांच्या प्राेफेशनल क्रिकेट युगाचा उदय हाेत असून गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सलामी सामन्याने याला सुरुवात हाेणार आहे. मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर सायंकाळी ७.३० वाजेपासून हे दाेन्ही संघ समाेरासमाेर असतील. जागतिक दर्जाच्या स्पर्धेत आपल्या उल्लेखनीय खेळीतून महिला क्रिकेटपटू जगभरातील मैदाने गाजवत आहेत. आज होणाऱ्या महिला प्रीमियर लीगच्या अपहील्याच सामन्यात मुंबईची मदार ही संपूर्णतः अष्टपैलू खेळाडूंवर असणार आहे. वाचा सविस्तर
आता पाहुयात आज दिवसभर आपली नजर कशावर असणारे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.