आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानमस्कार,
दिव्य मराठीच्या मॉर्निंग न्यूज ब्रिफमध्ये आपले स्वागत आहे. आज मंगळवार 8 मार्च असून फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. पाहुयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी.
चौथ्यांदाही इम्रान खान काेर्टात हजर नाही
सरकारी भेटवस्तू विकल्याप्रकरणी म्हणजेच तोशाखाना प्रकरणामध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान सलग चौथ्यांदा इस्लामाबाद काेर्टात हजर झाले नाहीत. मंगळवारीही कोर्टाचे न्यायाधीश त्याची वाट पाहात बसले होते. दरम्यान, इस्लामाबाद हायकाेर्टाने मंगळवारी इम्रानविरुद्धच्या अटक वॉरंटला १३ मार्चपर्यंत स्थगिती दिली. याचा अर्थ त्यांना १३ मार्चपर्यंत अटक करता येणार नाही. न्यायालयाने पाकिस्तानचे लष्करप्रमुख प्रमुख खान यांना १३ मार्चपूर्वी सुनवणीसाठी खालील कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. वाचा सविस्तर
रेल्वे नोकरी घोटाळा प्रकरणी लालूंची साडेचार तास चौकशी
रेल्वेत नोकरीच्या बदल्यात जमीन घेतल्याप्रकरणी सीबीआयने मंगळवारी माजी रेल्वेमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांची नोकरी घोटाळ्याप्रकरणी दिल्लीत दोन फेऱ्यांमध्ये चौकशी केली आहे. यावेळी सकाळी तीन तास आणि नंतर दुपारी दीड तास त्यांना प्रश्न विचारण्यात आले आहेत. यापूर्वी सोमवारीच पाटण्यातील निवासस्थानी सीबीआयने राबडीदेवींची सुमारे पाच तास चौकशी केली. वाचा सविस्तर
दारू धोरण प्रकरणात सिसोदियांची ५ तास चौकशी
दिल्ली दारू धोरण प्रकरणात तिहार तुरुंगात बंद असलेले आप नेते मनीष सिसोदिया यांची ईडीने मंगळवारी पाच तास चौकशी केली. या प्रकरणी ईडीने हैदराबादमधील मद्यविक्रेता अरुण रामचंद्र पिल्लई याला अटक केली आहे. या प्रकरणातील ही ११ वी अटक आहे. सध्या ईडी सिसोदिया यांच्या ताब्यातील सेलफोन बदलणे आणि नष्ट करणे यासोबतच मंत्री असताना घेतलेले निर्णय आणि टाइमलाइन तपासत आहे. वाचा सविस्तर
भाजपच्या मिशन 2024 च्या रणनीतीसाठी टीम तयार
भारतीय जनता पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी तीन सरचिटणीसांची टीम स्थापन करून त्यांच्यावर पायाभूत रणनीती आखण्याची जबाबदारी सोपवली आहे. सरचिटणीस विनोद तावडे, सुनील बन्सल आणि तरुण चुग हे टीम म्हणून काम करणार असून, अन्य पदाधिकारी त्यांच्यासोबत असतील. पक्षाच्या केंद्रीय आणि राज्य कार्यकारिणीच्या वरिष्ठ नेत्यांचे कार्यक्रम ही टीम निश्चित करणार आहे. ही टीम होळीनंतर आपले काम सुरू करणार आहे. वाचा सविस्तर
महाराष्ट्रासह भारतातील दहा राज्यांत वातावरण बदल
१९५० पासून २०५० पर्यंत वातावरणातील बदल आणि प्रदूषणाचा सर्वाधिक धोका असणाऱ्या जगातील २०० राज्यांत भारतातील १० राज्ये आहेत. बिहार सर्वाधिक जोखमीचे असून २०० राज्यांत महाराष्ट्र ३८ व्या स्थानी आहे. एका अहवालामध्ये प्रतिकूल हवामान व हवामान बदलाचे माॅडेल तयार करण्यात आले आहे. यात पूर, वनांतील आग, उष्णतेची लाट, समुद्र पातळी वाढीमुळे मालमत्तेचे होणारे नुकसान याचा अभ्यास करण्यात आला. वाचा सविस्तर
WPLमध्ये दिल्लीचा सलग दुसरा विजय
दिल्ली कॅपिटल्सने मंगळवारी महिला प्रीमियर लीगमध्ये दुसरा विजय नोंदवलाय. संघाने यूपी वॉरियर्सचा 60 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत 4 गडी गमावून 211 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात यूपीला 20 षटके खेळून 5 गड्यांच्या मोबदल्यात 169 धावाच करता आल्या. यूपीकडून मॅकग्राने नाबाद 91 धावा केल्या. वाचा सविस्तर
आता पाहुयात आज दिवसभर आपली नजर कशावर असणारे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.