आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 प्रश्नांतून समजून घ्या गुजरात निवडणुकीचे गणित:भाजपने दिले विकास-हिंदुत्वाचे पॅकेज, AAPमुळे विरोधकांची मते फुटली

अहमदाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्या गुजरातमधील ऐतिहासिक विजयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाच्या त्सुनामीसह भाजपची यशस्वी रणनीतीही कारणीभूत आहे. भाजपने ही संपूर्ण निवडणूक आपला व परक्याभोवती फिरती ठेवली. तसेच मतदारांना गुजरात मॉडल म्हणून हिंदुत्व व विकासाचे नवे पॅकेज दिले. यामुळे मतदान करणाऱ्या अर्ध्याहून अधिक लोकांना केवळ कमळाचेच बटन दाबावे लागले.

AAPने येथील निवडणूक त्रिकोणी बनवण्याऐवजी थेट काँग्रेसच्याच मतांत फूट पाडली. यामुळे भाजपला जागा व मतदान या दोन्ही बाबतींत नवा विक्रम प्रस्थापित करण्याची संधी मिळाली.

चला तर मग जाणून घेऊया गुजरात निवडणुकीतील भाजपच्या ऐतिहासिक विजयाची 8 कारणे. तसेच भविष्यातील राजकारणावर ही निवडणूक किती व कसा परिणाम टाकेल हे ही जाणून घेऊया...

1. भाजपच्या या ऐतिहासिक विजयाचे सर्वात मोठे कारण काय?

मोदींची लाट नव्हे त्सुनामी. याचे मुख्य कारण जनतेतील आपले विरुद्ध परक्यांचा मुद्दा. काँग्रेसला स्थानिक उमेदवार देता आली नाही. तर आपने ही निवडणूक अरविंद केजरीवाल यांच्याच चेहऱ्यावर लढली. यामुळे यंदा भाजपला गतवेळच्या तुलनेत विक्रमी मतदान (52.5%) व जागा (157) मिळाल्या.

2. मोदींच्या बळावर एवढा मोठा विजय शक्य आहे?

मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाले. पण गुजरातींना आजही ते गुजरातमध्येच असल्याचे वाटते. ते त्यांच्याकडे आपला सन्मान म्हणून पाहतात. मोदींनी एकदा गुजरातमध्ये येऊन सांगितले तर दुसरे कुणाचीही ऐकण्याची गरज नाही, असे त्यांना वाटते. यावेळी मोदींनी अहमदाबादमध्ये 54 किमीचा सर्वाधिक लांब रोड शोसह 3 रोड शो, तसेच 31 सभा घेतल्या. 95% भागात भाजपला विजय मिळाला. पण तो केवळ मोदींमुळे मिळाला असे म्हणणे चुकीचे आहे.

3. मग भाजपची सर्वात मोठी रणनीती कोणती होती?

हिंदुत्व व विकासाचे पॅकेज. हिंदुत्वाची प्रयोगशाळा गुजरातमधून सुरू झाल्याचे सर्वश्रूत आहे. 2002 च्या गुजरात दंगलीनंतर भाजपने हिंदुत्वाच्या मुद्यावर 127 जागांसह ऐतिहासिक विजय मिळवला. त्यानतंर 2003 मध्ये व्हायब्रंट गुजरात समिट सुरुवात केली. विकासाचे नवे गुजरात मॉडेल तयार केले. त्यानंतर राम मंदिर, तीन तलाक व कलम 370 चा खात्मा करून मतदारांना आपल्याकडे आकर्षित केले.

4. गुजरातमध्ये AAPचे दिल्ली मॉडल का फेल गेले?

वीज बिल माफ, सरकारी रुग्णालयांत मोफत उपचार व मोफत गुणवत्तापूर्ण शिक्षण आपच्या दिल्ली मॉडलचा प्रमुख भाग आहे. पण भाजपने मोफतच्या गोष्टी चांगल्या नसतात हे पटवून दिले. त्यानतंर भाजपने दिल्ली मॉडलची गुजरात मॉडलशी तुलना करून त्याचा संबंध गुजराती अस्मितेला जोडला. म्हणजे गुजरात मॉडलचे गुजरातींच्या मॉडेलमध्ये रुपांतर केले.

5. गुजरातमध्ये AAPची रणनीती फेल ठरली?

गुजरात निवडणुकीच्या माध्यमातून पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून देण्याची AAPची रणनीती होती. त्यांची ही रणनीती यशस्वी ठरली. या निवडणुकीत आपला जवळपास 13% टक्के मते मिळाली. त्यामुळे आपला राष्ट्रीय दर्जा मिळण्याची केवळ औपचारिकता बाकी आहे.

6. AAPमुळे कुणाला फायदा-तोटा?

2017 मध्ये काँग्रेसचे व्होट शेयर 41% होते. ते 28% वर घसरले. म्हणजे त्याचे व्होट शेयर 13 टक्क्यांनी घटले. दुसरीकडे, आम आदमी पार्टीला 13 टक्के मते मिळाली. त्यामुळे भाजप विरोधातील 41 टक्के मते दोन भागांत विभागली गेल्याचे स्पष्ट झाले.

7. AAP मैदानात नसती तर भाजप सत्तेत आली असती?

असेही नाही. भाजपला ऐतिहासिक 53% मते मिळाली. त्यामुळे संपूर्ण विरोधी पक्ष एकजूट झाले असले तरी भाजपला सरकार स्थापन करण्यात कोणतीही अडचण आली नसती. हो, पण व्होट शेयर व जागा जरूर कमी झाल्या असत्या. 2017 मध्ये भाजपचे व्होट शेयर 49% होते, ते वाढून 53% वर पोहोचले.

8. काँग्रेसने सर्वात मोठी चूक कोणती केली?

काँग्रेसने पहिल्या दिवसापासूनच गांधी कुटुंबातील सदस्य गुजरात निवडणुकीच्या प्रचारापासून दूर राहतील अशी रणनीती तयार केली. राहुल गांधींनीही एका दिवसात केवळ 2 सभा घेतल्या. स्थानिक नेते व लोकल लेव्हलवर काँग्रेसच्या प्रचाराची हीच रणनीती होती. पण ती चुकीची ठरली. यामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ग्रामीण भागात अत्यंत वाईट पद्धतीने पराभव झाला.

शेवटी: गुजरात निवडणुकीचा देशाच्या राजकारणावर कोणता परिणाम पडेल?

गुजरातमध्ये 27 वर्षांपासून भाजपचे सरकार आहे. अँटी इनकम्बेंसीचा निपटारा करण्यासाठी निवडणुकीला वर्षभराचा अवधी शिल्लक असताना भाजपने मुख्यमंत्री व संपूर्ण मंत्रिमंडळ बदलले. यामुळेही भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला. त्यामुळे पुढील वर्षी मध्य प्रदेशात होणाऱ्या निवडणुकीसह इतर भाजप शासित राज्यांतही हा प्रयोग पहावयास मिळू शकतो. तसेच मोदी-शहा जोडीवरही देश व भाजपचा विश्वास आणखी वाढला आहे. यामुळे भाजप 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आपल्या अजेंड्यावर वेगाने काम करण्यास सुरुवात करेल.

बातम्या आणखी आहेत...