आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेरळच्या त्रिवेंद्रमहून मस्कतला जाणारे एअर इंडियाचे विमान तांत्रिक अडचणीमुळे माघारी फिरले. एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाने त्रिवेंद्रम येथून सकाळी 8.30 वाजता उड्डाण केले. यानंतर फ्लाइट मॅनेजमेंट सिस्टममध्ये बिघाड झाल्याने सकाळी 9.17 वाजता लँडिंग झाले. या फ्लाइटमध्ये 105 प्रवासी होते.
आजच्या दुसऱ्या महत्त्वाच्या बातम्या...
पाणबुडी वागीर नौदलात सामील, पाण्याखाली 40 KMPH वेगाने धावणार
कलावरी क्लासची पाचवी पानबुडी वागीर सोमवारी सकाळी नौदलात दाखल झाली. अॅडमिरल आर हरिकुमार यांनी मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे वागीरला सुपूर्द केले.पाण्याखाली वागीरची वेग 40 किलोमीटर प्रतितास असणार आहे. तर पाण्यावरील वेग प्रतितास 20 किमी असणार आहे.
तवांग संघर्षाच्या 6 आठवड्यांनंतर लष्करप्रमुख अरुणाचलमध्ये दाखल
लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे शनिवारी अरुणाचल प्रदेशात पोहोचले. या ठिकाणी त्यांनी एलएसीला लागून असलेल्या भारतीय चौक्यांना भेट दिली. भारताची तयारी आणि सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. हे ठिकाण तवांगच्या जवळ आहे, ज्या ठिकाणी 6 आठवड्यांपूर्वी भारत आणि चीनच्य सैनिकांमध्ये चकमक झाली होती.
केरळमध्ये ट्रकने कारला धडक दिली, 5 ठार
केरळमधील अलप्पुझा येथे रविवारी रात्री एका ट्रकने कारला धडक दिली. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरा राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाल्याची माहिती अंबालापुझा पोलिसांनी दिली.
सोमालियातील सरकारी इमारतीवर दहशतवादी हल्ला, 5 ठार; 6 दहशतवादीही मारले गेले
सोमालियाची राजधानी मोगादिशू येथील महापौर कार्यालयाबाहेर दहशतवादी हल्ला झाला. आधी स्फोट झाला, त्यानंतर काही दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला. तर 16 जण जखमी झाले आहेत. अल-शबाब या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, स्फोटानंतर दहशतवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. यावेळी पोलिसांनी 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.