आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानमस्कार,
दिव्य मराठीच्या मॉर्निंग न्यूज ब्रिफमध्ये आपलं स्वागत. आज गुरुवार 2 फेब्रुवारी असून माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी. पाहुयात आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी.
अर्थमंत्री सीतारामन यांनी सादर केला देशाचा अर्थसंकल्प
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल देशाचा अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकार 2.0 मधील हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना दिलासा देणारा असल्याचे सत्ताधाऱ्यांनी म्हटले आहे. तर विरोधकांनी मात्र या अर्थसंकल्पावर टीका केलीय. तर नेटकऱ्यांकडून देखील सोशल मीडियावर या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. अनेक मिम्सही व्हायरल झालेत. वाचा सविस्तर
निर्णायक सामन्यात भारताचा विजय, मालिका खिशात
टीम इंडियाने तिसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा 168 धावांनी पराभव करत मालिका 2-1 ने जिंकली. अहमदाबाद येथे झालेल्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात शुभमन गिलच्या नाबाद 126 धावांच्या खेळीमुळे भारताने 20 षटकात 4 गडी गमावून 234 धावा केल्या. प्रत्युत्तरात किवी संघ 12.1 षटकांत 66 धावांत सर्वबाद झाला.आज भारताचा सर्वात मोठा विजय आणि टी-20 क्रिकेटमधील धावांच्या बाबतीत न्यूझीलंडचा सर्वात मोठा पराभव झाला आहे. वाचा सविस्तर
महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीचा इशारा
देशाच्या उत्तरेत मागच्या काही दिवसांपासून हिमवृष्टी होत असल्याने उत्तरेतील राज्यात थंडीची लाट कायम आहे. यादरम्यान महाराष्ट्रात पुढच्या दोन दिवसांत पुन्हा थंडीची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. येत्या 48 तासांत कडाक्याच्या थंडीचा इशारा देत किमान पारा 2 ते 4 अंशांनी खाली घसरण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवलीये. वाचा सविस्तर
अदानी एंटरप्रायझेसने FPO घेतला मागे
अदानी एंटरप्रायझेसने 20 हजार कोटींचा एफपीओ मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत अदानी समूहानं परीपत्रक जारी केले आहे. सध्याची परिस्थिती आणि बाजारातील अस्थिरता लक्षात घेत कंपनीने एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यासोबतच गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलं आहे. तर शेअर बाजारातील पडझडीनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी अदानी यांना मागे टाकत पुन्हा पुन्हा जगातील सर्वात श्रीमंत भारतीय बनलेत. वाचा सविस्तर
अर्थसंकल्पावर मोदी, शिंदे, फडणवीस यांची प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना अपेक्षांची पूर्ती करणारा अर्थसंकल्प असून 2023 चा अर्थसंकल्प गावं, गरीब, शेतकरी आणि मध्यमवर्गासह प्रत्येकाची स्वप्ने पूर्ण करेल, असे म्हटलं आहे. तर मुख्यमंत्री शिंदे यांनी समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून त्याचे राज्याचे वतीने मनापासून स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया दिलीये. तर आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पामुळे राज्यातील सहकार क्षेत्र आणि साखर कारखानदारीला बुस्ट मिळेल, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. वाचा सविस्तर
आता पाहुयात आज दिवसभर आपली नजर कशावर असणारे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.