आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानमस्कार
दिव्य मराठीच्या मॉर्निंग न्यूज ब्रिफमध्ये आपलं स्वागत. आज रविवार 5 फेब्रुवारी असून माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. पाहुयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी.
मोदी सलग तिसऱ्या वर्षी जगातील सर्वात लोकप्रिय नेते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून निवड झाली आहे. अमेरिकन डेटा इंटेलिजन्स फर्म 'द मॉर्निंग कन्सल्ट'च्या सर्वेक्षणानुसार, मोदी यांनी अप्रूव्हल रेटिंगमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह 22 देशांच्या नेत्यांना मागे टाकले आहे. या यादीत मोदींचे अप्रूव्हल रेटिंग 78% आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन ४०% रेटिंगसह ७व्या क्रमांकावर असून ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे १६व्या स्थानावर आहेत. वाचा सविस्तर
पोटनिवडणुकीसाठी मविआ, भाजपचे उमेदवार जाहीर
भाजपच्या लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपनं उमेदवार जाहीर केलेत. कसबापेठ मतदारसंघातून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीये तर चिंचवड मतदारसंघातून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. तर मविआकडून कसबा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर आणि चिंचवडमधून राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आलीय. वाचा सविस्तर
महाराष्ट्र गारठला, अनेक ठिकाणी तापमानात घट
राज्यात थंडीत वाढ झालीये. अनेक ठिकाणी तापमानात घट झालीये. तसेच पुढील दोन दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. गेल्या दोन दिवसात राजयोतील अनेक जिल्ह्यात तापमानात घट झालीये. विदर्भातही गारठा वाढला. तर शनिवारी औरंगाबादमध्ये ९.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. वाचा सविस्तर
मुंबई मनपाचा अर्थसंकल्प सादर
मुंबई मनपाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. 52 हजार 619 कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प सादर झालाय. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट कोस्टल रोडसाठी यंदा 3 हजार 545 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीये. तसेच यंदाच्या अर्थसंकल्पात विविध मोठ्या कामांवर एकूण 27 हजार 247 कोटी भांडवली खर्च करण्याची तरतूद आहे. यंदा मुंबईत पाणी तुंबू नये, यासाठी अर्थसंकल्पात कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. "हिंदूह्यसम्राट बालासाहेब ठाकरे- आपला दवाखाना" साठी अर्थसंकल्पात 50 कोटी रुपये देण्यात आले आहेत. वाचा सविस्तर
शुभांगी पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश, सत्यजीत तांबेंचे पटोलेंवर आरोप
नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांना कडवी झुंज देणाऱ्या शुभांगी पाटील यांनी आज अधिकृतरित्या ठाकरे गटात प्रवेश केला. मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांनी हाती शिवबंधन बांधले. तसेच, आता खरी लढाई सुरू झाली आहे, असा सूचक इशाराही शुभांगी पाटील यांनी दिला आहे. तर दुसरीकडे सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषदेत नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच, आपण यापुढेही अपक्षच राहणार, असेही सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केले. वाचा सविस्तर
सिद्धार्थ- कियाराच्या लग्नविधींना आजपासून सुरुवात
बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे सातत्याने चर्चेत आहेत. आता अखेर 6 फेब्रुवारी रोजी ते लग्नगाठीत अडकणार आहेत. लग्नासाठी कियारा जैसलमेरमध्ये दाखल झाली आहे.जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसवर त्यांचा लग्नसोहळा पार पडणारे. तसेच आजपासून त्यांच्या लग्नविधींना देखील सुरुवात होणारे.
आता पाहुयात आज दिवसभर आपली नजर कशावर असणारे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.