आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानमस्कार,
दिव्य मराठीच्या मॉर्निंग न्यूज ब्रिफमध्ये आपले स्वागत आहे. आज रविवार ५ मार्च असून फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. पाहुयात आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी.
नामांतरावरून राजकारणाचे पडघम
औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर झाले आहे. केंद्र सरकारकडून या निर्णयाला अधिकृत परवानगी दिल्यानंतर या निर्णयाविरोधात खासदार इम्तियाज जलील यांनी कालपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले. छत्रपती संभाजी महाराज महापुरूष आहेत त्यांचा आदर करण्यात कोणताही वाद नाही, पण त्याबाबत सुरू असणाऱ्या राजकारणाविषयी आक्षेप असल्याचे जलील यांनी म्हटलंय. वाचा सविस्तर
सिसोदियांच्या कोठडीत 2 दिवसांची वाढ
दिल्ली मद्य धोरण प्रकरणी अटक करण्यात आलेले माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना शनिवारी राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. यादरम्यान सीबीआयने आणखी तीन दिवसांच्या कोठडीची मागणी केली... दरम्यान, न्यायालयाने त्यांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे. त्याचबरोबर सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर आता 10 मार्च रोजी निर्णय होणार आहे. वाचा सविस्तर
WPL मध्ये मुंबई इंडियन्स 143 धावांनी विजयी
मुंबई इंडियन्सने पहिल्या महिला प्रीमियर लीगचा सलामीचा सामना जिंकला आहे. मुंबईने गुजरात जायंट्सचा 143 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयात फिरकीपटू सायका इशाक आणि कर्णधार हरमनप्रीत कौर या जोडीचे मोठे योगदान आहेत. इशाकने 3.1 षटकात 4 बळी घेतले, तर हरमनप्रीत कौरने लीगमधील पहिले अर्धशतक झळकावले. तिने 14 चौकारांसह 65 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. वाचा सविस्तर
BMCतील घोटाळा बाहेर काढल्याने हल्ला- देशपांडे
मुंबई महापालिकेतील कोविड घोटाळा बाहेर काढल्यामुळे माझ्यावर हल्ला झाला. या हल्ल्यामागील सुत्रधार मला माहिती आहे. मात्र, आता हल्ल्याबाबत पोलिस तपास सुरू असल्यामुळे यावर अधिक भाष्य करणार नाही, असे विधान मनसे नेते संदीप देशपाडे यांनी केलंय. तर, हल्ला झाल्यानंतर मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक चौकशी केली असेही देशपांडेंनी सांगितले. वाचा सविस्तर
राहुल गांधींनी केली चीनची प्रशंसा
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठात चीनची प्रशंसा केली आहे.चीनचे इन्फ्रास्ट्रक्चर रेल्वे असो किंवा विमानतळ, सर्वकाही निसर्गाशी निगडीत आहे. चीन निसर्गाशी घट्टपणे जोडलेला असल्याचे त्यांनी म्हंटलय. तर दुसरीकडे अमेरिकेविषयी बोलायचे तर अमेरिका स्वतःला निसर्गापेक्षा मोठा समजतो. यावरून चीनला शांतता आवडते हे स्पष्ट होते असेही मत त्यांनी व्यक्त केलंय. वाचा सविस्तर
आता पाहुयात आज दिवसभर आपली नजर कशावर असणार आहे...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.