आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानमस्कार,
दिव्य मराठीच्या मॉर्निंग न्यूज ब्रिफमध्ये आपले स्वागत आहे. आज गुरुवार 9 मार्च असून फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी आहे. पाहुयात आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी.
आज मांडला जाणार राज्याचा अर्थसंकल्प
आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. दरम्यान काल यंदाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आलाय... राज्याच्या आर्थिक विकास दरात 6.8 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. उद्योगात 6.1 टक्के, तर कृषी आणि संलग्न कार्ये क्षेत्रात 10.2 टक्क्यांची वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वाचा सविस्तर
अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन
प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे गुरुवारी निधन झाले. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या मित्राला श्रद्धांजली वाहताना अनुपम खेर यांनी लिहिले की, सतीश तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखे राहणार नाही. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वाचा सविस्तर
संजय राऊत यांचे हक्कभंग नोटीसला उत्तर
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाच्या हक्कभंग नोटिशीला उत्तर दिलं आहे. "संपूर्ण विधीमंडळाबाबत मी कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केले नसून माझे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतेच मर्यादित आहे. विधीमंडळाच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता मी केलेलं वक्तव्य तुम्ही तपासू पाहावं," अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केली. तसेच या प्रकरणाबाबत सविस्तर खुलासा करण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी राऊतांनी केली. वाचा सविस्तर
WPL मध्ये बंगळुरूचा सलग तिसरा पराभव
गुजरात जायंट्सने बुधवारी महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 11 धावांनी पराभव केला. गुजरातचा हा स्पर्धेतील पहिला विजय आहे, तर बेंगळुरूचा सलग तिसरा पराभव आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 7 गडी गमावून 201 धावा केल्या. प्रत्युत्तरात बंगळुरूचा संघ 20 षटकांत 6 बाद 190 धावाच करता आल्या.. आज दिल्ली कपिटल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये सामना रंगणार आहे. वाचा सविस्तर
श्रीलंका नेहमीच भारताची कृतज्ञ- अली साब्रे
संकटाच्या काळात भारताने मदत केली असून श्रीलंका नेहमीच भारताची कृतज्ञ राहिली, असे श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री अली साब्रे यांनी म्हटले. तसेच कठीण परिस्थितीत आणि वाईट परिस्थितीत मदत करतो, तोच खरा मीत्र असतो. हे भारताने केले आहे असेही त्यांनी म्हटलंय... काही महिन्यांपूर्वी श्रीलंका दिवाळखोर झाली होती. त्यावेळी भारत सरकारने श्रीलंकेला अन्न, इंधन आणि औषधासह सुमारे 3 अरब डॉलर फॉरेन डिपॉजिट दिले होते. वाचा सविस्तर
भारत-ऑस्ट्रेलिया चाैथी कसाेटी आजपासून
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना आजपासून रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सकाळी 9.30 वाजता सामन्याला सुरुवात होणारे. भारतीय संघ या सामन्यात विजय मिळवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी मैदानात उतरणार आहे. मालिकेत भारताने सध्या २-१ ने आघाडी घेतलीये... मात्र आता शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला तर मालिकेत २-२ अशी बरोबरी होईल... त्यामुळं कसोटी मालिकेतील शेवटचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.
आता पाहुयात आज दिवसभर आपली नजर कशावर असणार आहे...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.