आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानमस्कार,
दिव्य मराठीच्या मॉर्निंग न्यूज ब्रिफमध्ये आपलं स्वागत. आज रविवार १२ मार्च असून फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी. पाहुयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी.
लँड फॉर जॉब्स घोटाळा प्रकरण
लँड फॉर जॉब्स घोटाळ्याप्रकरणी चौकशी करत असलेल्या ईडीने तपासात ६०० कोटींची अवैध मालमत्ता सापडली असल्याचे म्हटले आहे. यात ३५० कोटी रुपयांची अचल संपत्ती आहे, तर २५० कोटींचे अनेक व्यवहार अज्ञातांद्वारे केले आहेत असा आरोप केला. शुक्रवारी छाप्यात १ कोटी रोख, १,९०० डॉलर, ५४० ग्रॅम सोन्याची नाणी आणि १.५ किलोहून अधिक सोन्याचे दागिने जप्त केले. यावेळी तेजस्वी यांनी ४ लाखांत खरेदी केलेल्या दिल्लीत फ्रंेड्स कॉलनी भागातील डी-१०८८ क्रमांकाचा ४ मजली बंगला आता १५० कोटीचा असल्याचे ईडीने सांगितले आहे. वाचा सविस्तर
गुजरात भाजपच्या फक्त 4 खासदारांना पुन्हा संधी
मे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्ये भाजप विद्यमान २६ खासदारांपैकी केवळ चार खासदारांना पुन्हा उमेदवारी देणार आहे. उर्वरित २२ जागी पक्षाने प्रस्थापितांची तिकिटे कापण्याची तयारी केली आहे. पुन्हा संधी मिळणाऱ्या चेहऱ्यांमध्ये अमित शहा, सी.आर. पाटील, विनाेद छावडा, भारतीबेन शियाल यांचा समावेश आहे. गुजरातमध्ये लाेकसभेच्या २६ जागा आहेत. सर्व जागांवर भाजपचे खासदार आहेत. ८ जागांवर विद्यमान आमदारांना संधी दिली जाईल. वाचा सविस्तर
येद्दींना एमजीआरसारखे आयकॉन बनवणार भाजप
भाजपने दक्षिणेतील एकमेव बालेकिल्ला कर्नाटकात मोठा डाव लावला आहे. एन. टी. रामाराव आणि एम. जी. रामचंद्रन यांना आयकॉनचा दर्जा असल्याप्रमाने आता भाजप येथे माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पांना राजकीय प्रस्थापित करू पाहतेय. सध्या इथे त्यांची मोठ्या प्रमाणात इमेज बिल्डिंग करण्याचे कामी भाजपकडून सुरू असून कर्नाटकातील पुढील निवडणुकीसह भविष्यात मिशन साऊथ राबवणे हा या मागचा उद्देश आहे. वाचा सविस्तर
सतीश काैशिक यांच्या मृत्यूला मिळाले नवे वळण
सतीश काैशिक यांच्या मृत्यूला नवे वळण मिळाले आहे. काैशिक मृत्यूपूर्वी दिल्लीच्या कापसहेडा येथील एका फार्महाऊसमध्ये हाेते. सध्या फार्महाऊसचा मालक हा अत्याचारातील एक आराेपी असून तो फरार आहे. अशातच विकास मालूची पत्नी शानवी यांनी पाेलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार काैशिक फार्महाऊसमध्ये हाेळी खेळण्यासाठी नव्हे, तर माझ्या पतीकडे १५ काेटी रुपयांची मागणी करण्यासाठी आले हाेते असे म्हटले आहे. सोबतच माझा पती काैशिक त्यांची हत्या करू इच्छित हाेता असे म्हणत या प्रकरणाला आता मोठे वळण दिले आहे. वाचा सविस्तर
अमरावतीत शेतकऱ्यांचे चालू महिन्यापासून रेशन बंद
सरकारी स्वस्त धान्य दुकानातून रेशन प्राप्त करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर नवे संकट ओढवले आहे. या महिन्यापासून त्यांना रेशनऐवजी प्रतिव्यक्ती दरमहा 150 रुपये दिले जाणार आहे. दीडशे रुपये महिना म्हणजेच पाच रुपये रोज या सूत्रानुसार 3 लाख 81 हजार 862 शेतकऱ्यांना या निर्णयाचा फटका बसला आहे. रेशन वितरण प्रणालीतील उणीवा दूर करणे शक्य नसल्याने हळूहळू ही योजनाच बंद करण्याचा सरकारचा घाट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसोबतच रेशन दुकानदारांनीही नव्या योजनेला विरोध दर्शविला आहे. वाचा सविस्तर
आता पाहुयात आज दिवसभर आपली नजर कशावर असणारे.....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.