आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Divya Marathi News Headlines | Siddharth Kiara Marriage Today | Former Army Chief Of Pakistan Pervez Musharraf Death

मॉर्निंग न्यूज ब्रीफबिनविरोध पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न:पाकचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांचे निधन

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नमस्कार,

दिव्य मराठीच्या मॉर्निंग न्यूज ब्रिफमध्ये आपलं स्वागत. आज सोमवार 6 फेब्रुवारी असून माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी. पाहुयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी.

बिनविरोध पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रयत्न केले जात आहते. या निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जयंत पाटील, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. तसेच कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी उमेदवार न देण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केल्याचं समोर येत आहे. वाचा सविस्तर

राज्यात 8 फेब्रुवारीनंतर गारठा वाढणार

उत्तर भारतात चक्रवातामुळे ८ ते १० फेब्रुवारी दरम्यान पाऊस,बर्फवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलीये. त्यानुसार, बुधवारनंतर राज्यात पुन्हा गारठा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, रविवारी राज्यात सलग दुसऱ्या दिवशी किमान तापमान घसरल्याने वातावरणात गारवा होता. यामध्ये उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, पश्चिम महाराष्ट्रात पुणे, या ठिकाणी किमान तापमान नोंदवण्यात आले. वाचा सविस्तर

पाकचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांचे निधन

पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांचे काल निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. मुशर्रफ दीर्घकाळ आजारी होते. त्यांच्यावर दुबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना अमायलोइडोसिस नावाच्या आजाराने ग्रासले होते, त्यामुळे त्यांचे सर्व अवयव निकामी झाले. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर त्यांनी 1999 ते 2008 या कालावधील पाकिस्तानचे राष्ट्रपती म्हणून कारभार सांभाळला. वाचा सविस्तर

पाकिस्तानची वनडे विश्वचषकातून माघार घेण्याची तयारी

भारतीय क्रिकेटकडून पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. भारताने आशिया कप 2023 साठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला आहे. BCCI आणि PCB यांच्यातील या मतभेदानंतर आता पाकिस्तान क्रिकेट संघ 2013 च्या वनडे विश्वचषकातून माघार घेण्याच्या तयारीत आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत भारताने आशिया चषक 2023 खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. वाचा सविस्तर

विनोद कांबळीची पत्नीसह मुलाला मारहाण, FIR दाखल

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू विनोद कांबळी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. त्याच्या पत्नीने शुक्रवारी त्याच्याविरोधात मद्यधुंद स्थितीत मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, पोलिसांनी कांबळी विरोधात FIR दाखल केला आहे. पत्नीने केलेल्या दाव्यानुसार ही घटना शनिवारी दुपारी 1 ते 1.30 च्या सुमारास घडली. दरम्यान भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मुलालाही विनोद कांबळीने शिवीगाळ करत दोघांनाही पुन्हा बॅटने मारहाण केल्याचे पत्नीने तक्रारीत म्हटले आहे. वाचा सविस्तर

सिध्दार्थ - कियारा अडकणार विवाहबंधनात

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी हे दोघे आज विवाहबंधनात अडकणार आहेत. जैसलमेरच्या सुर्यागड पॅलेस मध्ये या दोघांचा विवाहसोहळा पार पाडणारे.दरम्यान, सिध्दार्थ आणि कियारा दोघेही जैसलमेरला पोहोचले असून कालपासूनच त्यांच्या लग्नविधिंना सुरुवात झालीय. वाचा सविस्तर

आता पाहुयात आज दिवसभर आपली नजर कशावर असणारे...

  • कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरणार
  • काँग्रेसचे देशभर एसबीआय आणि एलआयसीच्या कार्यालयासमोर आंदोलन
  • आजपासून आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा
  • सुप्रीम कोर्टाचे पाच नवे न्यायमुर्ती पदाची शपथ घेणार
बातम्या आणखी आहेत...