आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानमस्कार, दिव्य मराठीच्या मॉर्निंग न्यूज ब्रिफमध्ये आपले स्वागत आहे. आज मंगळवार 14 मार्च असून फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. पाहुयात आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी.
आजपासून 17 लाख कर्मचारी बेमुदत संपावर
२००४ पासून बंद केलेली जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्य सरकारचे शासकीय व निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेतर १७ लाख कर्मचारी मंगळवारपासून (१४ मार्च) बेमुदत संपावर जात आहेत. या संपामुळे राज्यातील सर्वच सरकारी विभागांचे कामकाज ठप्प होणार असून यंत्रणांवर आता मोठा ताण येणार आहे. तब्बल ४६ वर्षांनंतर सर्व थरांतील अधिकारी-कर्मचारी एकटवले असून त्यांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. यापूर्वी १९७७ मध्ये असा संप झाला होता. वाचा सविस्तर
नाथषष्ठी उत्सवाला सोमवारपासून सुरुवात
नाथषष्ठी उत्सवाला सोमवारपासून सुरुवात झाली. राज्यभरातून दिंड्या, पताका घेत सुमारे ४ लाख वारकऱ्यांची मांदियाळी नाथसागर धरणाजवळ जमली. पंढरपूरच्या वारीनंतर नाथषष्ठीची वारी ही सर्वात मोठी असते. येथे दिंडीतील वारकरी घरच्या देव्हाऱ्यातील देव आणतात व या देवांना गोदाकाठावर स्नान घातले जाते. राज्यभरातून नाथषष्ठी उत्सवात 550 दिंड्या सहभागी झाल्या आहेत. वाचा सविस्तर
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताची धडक
भारत हा सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशिपची अंतिम फेरी गाठणारा एकमेव संघ ठरला. आता भारत आणि स्ट्रेलिया संघांमध्ये २०२१-२३ च्या डब्ल्यूटीसीची फायनल हाेणार आहे. भारताने २०२१ मध्येही डब्ल्यूटीसीची अंतिम फेरी गाठली हाेती. यादरम्यान न्यूझीलंडविरुद्ध पराभवामुळे टीम इंडिया उपविजेता ठरली हाेती. आता कर्णधार राेहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आपल्या नावे करण्यासाठी उत्सुक आहे. वाचा सविस्तर
ब्रजभूषणविरुद्ध एकाही मल्लाची साक्ष नाही
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाच्या आरोपांच्या चौकशीसाठी स्थापन समितीने सोमवारी क्रीडा मंत्रालयाला अहवाल दिला. अहवालात आरोप सिद्ध करण्यासाठी कोणताच ठोस पुरावा किंवा साक्षी मिळाल्या नाहीत. सोबतच आरोप सिद्ध करण्यासाठी समितीसमोर एकही महिला मल्ल हजर झाली नाही असे म्हटले आहे. महासंघाच्या अध्यक्षांवर आरोप लावत मल्लांनी दिल्लीत आंदोलन केले होते. वाचा सविस्तर
राजस्थानात तिरंगा यात्रेसह आपची मोहीम
राजस्थानमध्ये या वर्षअखेरीस विधानसभा निवडणूक आहे. आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे सीएम भगवंत मान यांनी सोमवारी तिरंगा यात्रेसोबत निवडणूक मोहिमेला सुरुवात केली. यावेळी काँग्रेस-भाजपकडून राजस्थानमध्ये कचरा करण्यात आल्याने आप सर्व जागांवर लढणार असल्याचे केजरीवाल यांनी घोषित केले आहे. वाचा सविस्तर
RSS बैठकीनंतर होणार भाजपची बैठक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी सभेच्या बैठकीतून मिळालेल्या फीडबॅकबाबत भाजप सरचिटणीसांची याच आठवड्यात बैठक होणार आहे. यामध्ये पक्षाध्यक्ष जेपी नड्डा येत्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या रणनीतीबाबत चर्चा करतील. सूत्रांनुसार, संघाशी जोडलेले लोक एका वर्षापासून देशभरात सामान्य लोकांशी संवाद साधत आहेत. यामुळे लोकांच्या अपेक्षा आणि तक्रारी संघाला कळत आहेत. वाचा सविस्तर
कोपर्डीत बोरवेलमध्ये पडला 5 वर्षांचा मुलगा!
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातल्या कोपर्डीमध्ये शेतातील बोअरवेलमध्ये ऊसतोड कामगाराचा पाच वर्षांचा मुलगा पडल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडल्याचे समोर आले आहे. या मुलाला वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू असून एनडीआरएफची पाच पथके बचावकार्य करीत आहे. या बचावकार्यासाठी दोन जेसीबीद्वारे खोदकाम सुरू आहे. वाचा सविस्तर
आता पाहुयात आज दिवसभर आपली नजर कशावर असणारे.....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.