आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Divya Marathi News Headlines Telangana CM Daughter's Protest In Delhi | Heat Wave In Kokan Mumbai Today

मॉर्निंग न्यूज ब्रीफदेशात H3N2 एन्फ्लुएंझाने दोघांचा मृत्यू:आज काेकण-मुंबईत उष्णतेची लाट, पुढील 4 दिवस अवकाळीचे सावट

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ​​​​​

नमस्कार,

दिव्य मराठीच्या मॉर्निंग न्यूज ब्रिफमध्ये आपले स्वागत आहे. आज शनिवार 11 मार्च असून फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. पाहुयात आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी.

देशात पहिल्यांदा H३N२ एन्फ्लुएंझाने दोघांचा मृत्यू

देशात पहिल्यांदाच संसर्गजन्य एच 3 एन 2 एन्फ्लुएंझामुळे दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये कर्नाटकातील हासन जिल्ह्यातील ८२ वर्षीय वृद्धाचा आणि हरियाणातील ५६ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. दोन्ही रुग्णांना काही जुने आजार देखील होते. देशात जानेवारीपासून आतापर्यंत एच3एन2 एन्फ्लुएंझाचे ३०३८ रुग्ण आढळलेत तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार मार्चअखेरपर्यंत एच 3 एन 2 एन्फ्लुएंझा संसर्ग घटण्याची शक्यता आहे. दरम्यान, नीती आयोगाने शनिवारी एन्फ्लुएंझासंबंधी मंत्रालयांची बैठक बोलावली आहे. वाचा सविस्तर

तेलंगणाच्या सीएमच्या मुलीचे दिल्लीत उपाेषण

दिल्लीतील मद्य धाेरणात ईडी चाैकशीच्या आदल्या दिवशी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची कन्या तथा बीआरएस नेत्या के. कविता दिल्लीत उपाेषणाला बसल्या आहेत. केंद्राने अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक लागू करावे, अशी त्यांची मागणी आहे. या मुद्द्यावर सर्व पक्षांनी केंद्र सरकारवर दबाव आणावा आणि काँग्रेसने या मुद्द्यावर पाठिंबा द्यावा अशी मागणीही कविता यांनी केली आहे. वाचा सविस्तर

‘दिव्य मराठी’चा दुबई इंटरनॅशनल पुरस्कार सोहळा

‘दिव्य मराठी’चा दुबई इंटरनॅशनल पुरस्कार सोहळा आज ११ मार्च रोजी दुबईतील हॉटेल क्राऊन प्लाझा या पंचतारांकीत हॉटेलात पार पडणारा आहे. या सोहळ्याला दुबईतील हिज एक्सलन्सी अवाद मोहंम्मद बिन शेख मुजरीन (डायरेक्टर जनरल ऑफ इमिरट्स ट्रॅव्हलर्स फेस्टिव्हल) आणि ऑफिस ऑफ हिज हायनेस शेख जुमा बिन मख्तुम अल मख्तुम यांचे याकुब अल अली (एक्झुक्युटीव्ह डायरेक्टर अॅण्ड प्रायव्हेट अॅडव्हायझर) यांच्या हस्ते दिव्य मराठीचा दुबई इंटरनॅशनल अॅवॉर्ड चे वितरण होणार आहे. यावेळी राज्यभरातील मान्यवर पुरस्कार विजेत्यांचा होणार सन्मान. वाचा सविस्तर

आज काेकण-मुंबईत उष्णतेची लाट

काेकण आणि मुंबई परिसरात शनिवारपासून २ दिवस उष्णतेच्या लाटेत तापमान ३९ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महारा‌ष्ट्रावर मात्र येत्या साेमवारपासून पुढील ४ दिवस अवकाळी पावसाचे सावट राहणार आहे. मध्य प्रदेशावरील चक्राकार वाऱ्यामुळे राज्यातील वातावरणात हा परिणाम झाला आहे. या सोबतच १३ ते १६ मार्च आणि १५ ते १६ मार्च रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाचा सविस्तर

युवक काँग्रेस घालणार विधिमंडळाला घेराव

युवकांमधील बेरोजगारी, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने २० मार्च रोजी विधिमंडळाला घेराव घालण्यात येणार आहे. राज्यभरातून २० ते २५ हजार युवक या आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मितेंद्र सिंग व प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी काँग्रेस भवन येथे शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. वाचा सविस्तर

आता पाहुयात आज दिवसभर आपली नजर कशावर असणारे...

  • सीआयएसएफने हैदराबादमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.
  • मद्य धोरण प्रकरणी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची कन्या कविता यांची ईडी चौकशी करणार आहे.
  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना तिसऱ्या दिवशी खेळला जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...