आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Divya Marathi Morning News; Maharashtra Weather Forecast Report | Imran Khan | Marathwada

मॉर्निंग न्यूज ब्रीफआज मराठवाडा-विदर्भात पावसाचा अंदाज:पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नमस्कार,

दिव्य मराठीच्या मॉर्निंग न्यूज ब्रिफमध्ये आपलं स्वागत. आज सोमवार 6 मार्च असून फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी. पाहुयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी.

रत्नागिरीत ठाकरेंचा शिंदे सरकारवर घणाघात

उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीत काल सभा झाली. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. धनुष्यबाण घेण्याचा प्रयत्न करा; पण मेरा खानदान पुरा चोर है. हा कपाळावर लागलेला चोरीचा शिक्का अजिबात या जन्मात पुसला जाणार नाही'' असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केलाय. तसेच दिल्लीसमोर शेपट्या आत घालून बसणे हे बाळासाहेबांचे विचार नव्हते. आपल्या मुख्यमत्र्यांचा अर्धा वेळ दिल्लीतच जात आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. वाचा सविस्तर

आज मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यातील उत्तर महारा‌ष्ट्रात दोन दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आता आणखी पुढील २ दिवस मराठवाडा-विदर्भ भागांत वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच ७ मार्चला दाेन्ही विभागांत गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळं महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट आहे. वाचा सविस्तर

इम्रान खान यांना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

पाकिस्तानचे पोलिस रविवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या घरी पोहोचले. तोशाखाना प्रकरणात त्यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी मीडियानुसार, इम्रान यांच्या घरी पोलिस अधिकारी पोहोचले तेव्हा ते घरात नव्हते... यानंतर पोलिस नोटीस देऊन परतले. मात्र काही तासांनंतर इम्रान खान यांनी लाहोरमध्ये त्यांच्या समर्थकांना संबोधित केले. पाकिस्तानचा इतका अपमान कधीच झाला नाही, आमचे क्राइम मिनिस्टर भीक मागत फिरत असल्याचे विधान करत त्यांनी पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्यावर निशाणा साधला. वाचा सविस्तर

UP वॉरियर्सचा गुजरात जायंट्सवर विजय

महिला प्रीमियर लीगच्या रोमांचक सामन्यात यूपी वॉरियर्सने गुजरात जायंट्सचा 3 गडी राखून पराभव केला. यूपीला शेवटच्या 18 चेंडूत 33 धावांची गरज होती. संघाची फलंदाज ग्रेस हॅरिसने आक्रमक अर्धशतक ठोकून यूपीला विजय मिळवून दिला. तर महाराष्ट्राच्या किरण नवगिरे हिने तडाखेबंद अर्धशतकी खेळी केली. तर आज मुंबई इंडियंस आणि रॉयल चैलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना रंगणार आहे. वाचा सविस्तर

शीझान खानला जामीन मंजूर

तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शीझान खानला काल जामीन मिळाला आहे. बहिणी फलक नाज आणि शफाक नाझ त्याला घेण्यासाठी वसई कोर्टात पोहोचल्या होत्या. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर शीझान त्यांना मिठी मारून रडताना दिसला. जवळपास 70 दिवस कारागृहात राहिल्यानंतर शीझानला जामीन मिळाला. शीझान खानला 25 डिसेंबर 2022 रोजी तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. वाचा सविस्तर

आता पाहुयात आज दिवसभर आपली नजर कशावर असणार आहे

  • देशभर होळीचा उत्साह
  • दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना कोर्टात हजर केलं जाणार
  • खासदार इम्तियाज जलिल यांच्या साखळी उपोषणाचा तिसरा दिवस
बातम्या आणखी आहेत...