आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Divya Marathi News Headlines | Warning Of Heavy Rain For The Next 3 Days | Maharashtra Employees Strike For Old Pension

मॉर्निंग न्यूज ब्रीफराज्यात पुढील 3 दिवस जोरदार पावसाचा इशारा:जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी आक्रमक, संपामुळे कारभार ठप्प

5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नमस्कार,

दिव्य मराठीच्या मॉर्निंग न्यूज ब्रिफमध्ये आपले स्वागत आहे. आज बुधवार १५ मार्च असून फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी. पाहुयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी.

आज राज्यपालांतर्फे महाधिवक्ता तुषार मेहतांचा युक्तिवाद

राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणीला सर्वोच्च न्यायालयात मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. शिंदे गटाकडून मंगळवारी अ‍ॅड. हरीश साळवे यांनी प्रथम युक्तिवाद केला. त्यानंतर शिंदे गटाकडून इतरही तीन वकीलांकडून युक्तिवाद करण्यात आला आहे. मंगळवारची सुनावणी संपली असून बुधवारी राज्यपालांतर्फे महाधिवक्ता तुषार मेहता युक्तिवाद करतील. तसेच ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल हेही युक्तिवाद करणार आहेत.
दरम्यान शिवसेनेतील मतभेदांना फूट म्हणता येणार नाही असे शिंदे गटाचे वकील अ‍ॅड. साळवे यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर

राज्यात उद्यापासून 3 दिवस गारपिटीसह पावसाचा जोर

बदलत्या हवामानामुळे राज्यात मुंबई व कोकण वगळता उर्वरित भागात गुरुवार, १६ मार्च ते शनिवार, १८ मार्चपर्यंत तीन दिवस अवकाळी पावसासह काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे. दरम्यान, राज्यात मंगळवारी नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याने कांदा व द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंता वाढलीये. विदर्भातील अनेक जिल्हे मराठवाड्यात उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड तसेच मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अधिक पावसाची शक्यता आहे. वाचा सविस्तर

एकच मिशन, जुनी पेन्शनसाठी कर्मचारी आक्रमक

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सर्वच शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाने मंगळवारी पहिल्या दिवशी राज्यातील कारभार ठप्प झाला. अनके ठिकाणी शाळा बंद होत्या, मोठ्या रुग्णालयातल्या शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्या तसेच शासकीय कार्यालयांत कर्मचारी नसल्याने शुकशुकाट होता. दरम्यान, संप मोडून काढण्यासाठी राज्य सरकारने विधिमंडळात मंगळवारी अत्यावश्यक सेवा कायदा (मेस्मा) घाईत मंजूर केला. तसेच ऊर्जा व कामगार विभागाने रातोरात शासनादेश जारी करून कंत्राटी तत्त्वावर कामगारांची भरती सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अतिकुशल, कुशल, अर्धकुशल आणि अकुशल अशा ४ वर्गवारीमध्ये खासगी कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. वाचा सविस्तर

‘एच 3 एन 2’ सह कोरोना झालेल्या रुग्णाचा मृत्यू

देशात नव्याने आढळलेल्या ‘एच ३ एन २’ विषाणूसह कोरोनाबाधित असलेल्या रुग्णाचा अहमदनगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. एका मेडिकल कॉलेजचा तो विद्यार्थी होता, असे सांगण्यात येत असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. त्याच्या संपर्कातील १९ जणांचे नमुने आता तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. वाचा सविस्तर

इम्रान खानला अटक करण्यासाठी आलेल्यांवर झाली दगडफेक

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यासाठी वॉरंट घेऊन पोहोचलेले पोलिस आणि इम्रान समर्थक एकमेकांशी भिडल्याचे पाहायला मिळाले आहेत. लाहोरमधील जमान पार्कमधील इम्रान यांच्या निवासस्थानाबाहेर सायंकाळी समर्थकांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनीही प्रत्युत्तरात लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. इस्लामाबादच्या डीआयजीसह अनेक पाेलिस जखमी झाले आहेत. तोशाखाना प्रकरणात इस्लामाबादच्या जिल्हा न्यायालयाने इम्रान यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करत त्यांना १८ मार्च रोजी कोर्टात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. वाचा सविस्तर

आता पाहुयात आज दिवसभर आपली नजर कशावर असणारे....

  • लॅंड फॉर जॉब्स प्रकरणात लालू यादव, राबडी देवी आणि मीसा भारती यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर राहावे लागणार.
  • WPL मध्ये यूपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील सामना.
बातम्या आणखी आहेत...