आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसमध्ये नवा वाद:Ex सोशल मीडिया हेड दिव्या स्पंदनाचा आरोप -पक्षाने त्यांच्या ट्रोलिंगसाठी मॅसेज केले सर्क्युलेट

बंगळुरु2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसने आपले नेते व कार्यकर्त्यांकरवी आपल्याला ट्रोल केल्याचा खळबळजनक आरोप कर्नाटकच्या मांड्याच्या माजी खासदार तथा काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या माजी प्रमुख दिव्या स्पंदना यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे काँग्रेसमध्ये एकच खळबळ माजली आहे.

इंग्रजी व कानडीत आहेत मॅसेज

दिव्या यांनी हे स्क्रीनशॉट्स आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केलेत.
दिव्या यांनी हे स्क्रीनशॉट्स आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केलेत.

दिव्यांनी शेअर केलेले स्क्रीनशॉट्स कानडी व इंग्रजीत आहेत. त्यात नमूद करण्यात आले आहे -एवढी वर्षे तू कुठे होतीस? तुझ्याकडे अंबरीशच्या अंत्यसंस्काराला येण्याचाही वेळ नव्हता? तुला आता का जाग आली? तुला हे मांड्याच्या मतदारांना सांगता येईल काय? ओह माय गॉड, पहा कोण जिवंत आहे व पक्षाने काय करावे हे सांगत आहे. आराम करण्याची वेळ संपली की आजच झोप पूर्ण झाली?

दिव्याला ज्या अंबरीशविषयी प्रश्न केला जात आहे, ते कर्नाटकचे माजी बंडखोर नेते होते. त्यांचे 2018 मध्ये निधन झाले. त्यांची पत्नी सुमलता मांड्याच्या विद्यमान खासदार आहेत.

राहुल गांधींच्या टीम मेम्बरला केले टॅग

​​​​​​​

​​​​​​​दिव्याला त्यांना ट्रोल करण्यासाठी मॅसेज पूर्वीपासून तयार असल्याचे कळल्यानंतर त्या म्हणाल्या -कार्यालयाने हे मॅसेज काँग्रेस नेते व व्हॉलेंटियर्सला पाठवून मला ट्रोल करण्याच्या सूचना केल्या. तुम्ही स्वतःला त्रास करवून घेऊ नका. हे काम मी स्वतःच करेल.

त्यानंतर दिव्याने स्क्रीनशॉट्सच्या मालिका शेअर केली. हे ट्विट्स त्यांनी राहुल गांधींच्या टीमचे सदस्य व कर्नाटक काँग्रेसचे एक्स सोशल मीडिया हेड शिवकुमार व काँग्रेसचे श्रीवत्स वाय.बी. यांना टॅग केले.

2019 नंतर पदाचा राजीनामा

2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर दिव्या स्पंदनाने काँग्रेसच्या सोशल मीडिया हेडचे प्रमुखपद सोडून राजकारणातून ब्रेक घेतला. त्यांनी आपले सर्वच सोशल मीडिया अकाउंट्स डिलीट करण्याची माहिती सार्वजनिक केली होती. ते्हा स्पंदना पक्षाच्या कामकाजात सक्रियपणे सहभागी नव्हत्या. तथापि, त्या सोशल मीडिया सक्रिय आहेत. त्यांच्या जागी रोहन गुप्ता यांची सोशल मीडियाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आता सोडले मौन

दिव्याने काँग्रेस सोडल्यानंतर झालेल्या ट्रोलिंगवर एका ट्विटद्वारे आपली भूमिका स्पष्ट केले. त्या म्हणाल्या -काँग्रेस सोडल्यानंतर काही कानडी वृत्तवाहिन्यांनी मी पक्ष सोडण्यासाठी 8 कोटी घेवून पळून गेल्याचा दावा केला होता. मी पळून गेले नव्हते. मी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला होता. मी 8 कोटींसाठी पक्ष सोडला नव्हता. मी शांत राहिले ही माझी चूक होती.

बातम्या आणखी आहेत...