आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणादरम्यान केंद्र सरकारने संकेत दिले आहेत की, हाय-रिस्क ग्रुप म्हणजेच वृद्ध आणि फ्रंटलाइन हेल्थ वर्कर्ससाठी कोरोना व्हॅक्सीनला लवकर अप्रुव्ह केले जाईल. अद्याप व्हॅक्सीन येण्याची कोणतीच तारीख सांगितली नाही, तरीदेखील आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी मार्च 2021 पर्यंत व्हॅक्सीन उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. दरम्यान, अमेरिकन कंपनी फाइजरने दावा केला आहे की, त्यांची व्हॅक्सीन यावर्षी डिसेंबरपूर्वी अमेरिकन बाजारात उपलब्ध केली जाईल.
भारत चालू शकतो रशिया आणि चीनच्या मार्गावर
केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सोशल मीडियावर संडे संवाद कार्यक्रमात म्हटले की, सरकार हाय-रिस्क ग्रुप्स म्हणजेच वृद्ध आणि फ्रंटलाइन हेल्थ वर्कर्ससाठी लवकरच व्हॅक्सीनला मंजुरी देऊ शकते. यावर सर्वांना राजी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.हर्षवर्धन यांच्या बोलण्यावरुन स्पष्ट संकेत मिळत आहेत की, रशिया आणि चीनप्रमाणेच भारतात व्हॅक्सीनला लवकर अप्रुव्ह करुन हाय रिस्क ग्रुप्ससाठी उपलब्ध केले जाऊ शकते.
रशियाने आपल्या SPUTNIK V आणि चीनने आपल्या तीन व्हॅक्सीनला इमरजेंसी अप्रूव्हल दिले आहे. भारतातही तीन व्हॅक्सीनच्या चाचण्या सुरू आहेत. भारत बायोटेक आणि आयसीएमआर कोव्हॅक्सिन विकसीत करत आहेत. अहमदाबादची कंपनी जायडस कॅडीलाचे व्हॅक्सीन फेज-2 मध्ये आहे. तसेच, पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया ऑक्सफोर्ड/एस्ट्राजेनेकाच्या कोवीशील्ड व्हॅक्सीनच्या फेज-2 आणि फेज-3 ट्रायल्सवर आहे.
जगभरात व्हॅक्सीन उपलब्ध होण्यास चार ते पाच वर्षे लागतील
जगातील सर्वात मोठी व्हॅक्सीन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सीरम इंस्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, जगभरात 2024 पूर्वी व्हॅक्सीन उपलब्ध होणार नाही. ते म्हणाले की, प्रत्येक देशात प्रत्येक ठिकाणी व्हॅक्सीन जाण्यास चार ते पाच वर्षे लागू शकतात. पूनावाला यांनी फायनांशियल टाइम्सला म्हटले की, कंपनीने एस्ट्राजेनेका आणि नोवावॅक्ससह पाच कंपन्यांसोबत पार्टनरशिप केली आहे. एक बिलियन डोज बनवण्याची तयारी आहे. यातील अर्धे डोज भारतासाठी असतील.
कंपनी रशियातील गामालेया रिसर्च इंस्टिट्यूटसोबतही पार्टनर्शिप करण्याच्या तयारीत आहे. म्हणजे, SPUTNIK V ची मॅन्युफैक्चरदेखील सीरमला करता येईल. ऑक्सफोर्ड/एस्ट्राजेनेका व्हॅक्सीनचे ट्रायल्स यूकेमध्ये एक व्यक्ती आजारी पडल्यानंतर थांबवले होते. पण, चांगली बातमी ही आहे की, ब्रिटेनने व्हॅक्सीनच्या चाचण्यांना परत मंजुरी दिली आहे. सध्या सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाला भारतात ड्रग रेगुलेटरकडून ट्रायल्स परत सुरू करण्याची परवानगी मिळणे बाकी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.