आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Diwali 2021 । Big Announcement From Indian Railways, More Trains To Run On The Occasion Of Diwali

रेल्वेकडून प्रवाशांना खास गिफ्ट:भारतीय रेल्वेकडून मोठी घोषणा, दिवाळी सणानिमित्ताने रुळावर धावणार अधिकच्या रेल्वेगाड्या, प्रवाशांना गैरसोयपासून वाचवण्यासाठी रेल्वेचा निर्णय

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज देशभरात दिवाळीचा सण अगदी उत्साहात साजरा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर गावी येणाऱ्या-जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेता भारतीय रेल्वेने एक महत्त्वपुर्ण निर्णय घेतला आहे. वाढती प्रवाशांची गर्दी लक्षात घेता तसेच स्थानकांवरील गर्दी पाहता रेल्वेने सणासुदीच्या काळात विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच प्रवास सुकर करण्यासाठी नियमित गाड्यांमध्ये अधिकचे डबे देखील जोडण्यात आले आहे.

दिल्लीचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक डिंग गर्ग यांनी बाबतची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, 'दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने 79 अधिकच्या गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नियमित गाड्यांच्या डब्यात देखील वाढ करण्यात असून, अतिरिक्त 1085 डबे जोडण्यात आले आहेत. कोरोना खबरदारीचे पालन करून आम्ही फक्त आरक्षित प्रवाशांनाच गाड्यांमध्ये प्रवेश देत आहोत. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.' असे गर्ग म्हणाले.

सोबतच रेल्वेने स्टेशनच्या बाहेर होल्डिंग एरिया देखील तयार केला आहे. ज्यात एकावेळी 1000 प्रवाशी बसू शकतात. सणासुदीच्या काळात कोणत्याही प्रकार प्रवाशांची गैरसोय होऊ नये. याची खास व्यवस्था रेल्वेच्या वतीने करण्यात आली आहे.

बनावट एजंट विरोधी मोहीम
अनेकदा रेल्वे स्थानकांच्या बाहेर बनावट एजंट प्रवाशांची तिकीटांद्वारे लूटमार करत असतात. त्यामुळे आता रेल्वेने एजंट विरोधी मोहीम सुरू केली आहे. सोबतच अधिकच्या गाड्यांनी प्रवास सुखकर करण्यासाठी 110 विशेष गाड्या ह्या 668 फेऱ्या करणार आहेत. जेणेकरून दिवाळीमध्ये जनतेला चांगली सुविधा रेल्वेकडून मिळू शकेल.

बातम्या आणखी आहेत...