आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Diwali 2021। Prime Minister Narendra Modi To Celebrate Diwali With Soldiers In Jammu And Kashmir Today

दिवाळी 2021:पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू-काश्मीरमध्ये जवानांसोबत साजरी करणार दिवाळी, कलम 370 हटवल्यानंतर मोदींची जवानांसोबत असणार दुसरी दिवाळी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आज देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र यंदाही आपली दिवाळी सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांसोबत साजरी करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मोदी हे जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरा करणार आहे.

त्यापार्श्वभुमीवर नियंत्रण रेषेजवळ जवानांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे काश्मीर खोऱ्यातील अनेक भागात सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे. त्यामुळे जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याचे ठिकाण केव्हाही बदलू शकते. कारण सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी सुरक्षेच्या हेतूने गुप्तता ठेवली जाते.

मोदी यांनी 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर जवानांसोबत पहिल्यांदाच दिवाळी साजरी केली होती. मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने दिवाळी सण साजरा करण्यात आला नव्हता. त्यानंतर यावर्षी कोरोनाचा वेग मंदावल्याने मोदी आज दुसऱ्यांदा जवानांसोबत दिवाळी साजरा करणार आहे.

पंतप्रधान मोदी दिवाळीच्या दिवशी जवानांना आपला वेळ घालवतात. तसेच त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचे काम देखील करतात. मोदींनी याआधी उत्तराखंडमध्येही जवानांना दिवाळी साजरी केली होती.

बातम्या आणखी आहेत...