आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Diwali Firecrackers Ban In New Delhi | Firecrackers Ban Till January 1, 2023 In New Delhi

दिल्लीत फटाक्यांवर बंदी:1 जानेवारी 2023 पर्यंत फोडता येणार नाहीत, ऑनलाइन विक्री आणि वितरणालाही बंदी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीत 1 जानेवारी 2023 पर्यंत सर्व प्रकारच्या फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये फटाके बनवले जाणार नाहीत आणि साठवलेही जाणार नाहीत तसेच विकलेही जाणार नाहीत. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी ही घोषणा केली आहे. त्यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले - दिल्लीतील प्रदूषणाच्या धोक्यापासून लोकांना वाचवण्यासाठी गेल्यावर्षीप्रमाणे याही वेळी सर्व प्रकारच्या फटाक्यांवर बंदी घालण्यात येईल. फटाक्यांच्या ऑनलाइन विक्री आणि वितरणावरही बंदी असेल.

30 विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले आदेश
पोलिसांना फटाके बंदीच्या संदर्भात दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राय यांनी सोमवारी एका निवेदनात म्हटले होते की, हिवाळ्यात राजधानीतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी केंद्रीय आयोगाने उचललेल्या पावलांपेक्षा सरकार अधिक सावध असेल. राय यांनी संबंधित 30 विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर सांगितले की, सर्व विभागांना काम सोपवण्यात आले आहे. यासोबतच वायू प्रदूषण कमी करण्यासाठी योजना तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गेल्या वर्षीही बंदी घालण्यात आली होती
गेल्या वर्षीही प्रदूषण नियंत्रण समितीने फटाक्यांवर बंदी घातली होती. 1 जानेवारी 2022 पर्यंत फटाक्यांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. बंदीमागे कोरोना आणि प्रदूषण हे कारण सांगण्यात आले होते.

प्रदूषण हे दरवर्षी मृत्यूचे चौथे सर्वात मोठे कारण आहे
प्रदूषण हे जगातील मृत्यूचे चौथे सर्वात मोठे कारण आहे. 2019 मध्ये प्रदूषणामुळे 66.7 लाख लोकांचा मृत्यू झाला. 2018 मध्ये प्रदूषण हे मृत्यूचे 5 वे प्रमुख कारण होते. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये वायू प्रदूषणामुळे सर्वाधिक मृत्यू होत आहेत.

याशिवाय फटाक्यांमध्ये प्रकाशाच्या वेगवेगळ्या रंगांसाठी वेगवेगळी रसायने वापरली जातात. यातील बहुतांश रसायने पर्यावरणासाठी तसेच आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत.

बातम्या आणखी आहेत...