आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Diwali Gift | Electric Scooter | Gujarat Based Company Distributes Electric Scooters To Employees As Diwali Gift

दिवाळी गिफ्ट:गुजरातच्या कंपनीने कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट म्हणून दिल्या इलेक्ट्रिक स्कूटर; पेट्रोलवर बाइक, स्कूटरवर येणाऱ्यांना दिला लाभ

सुरतएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळी निमित्त विविध कंपन्या आप-आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस आणि भेटवस्तू देत असतात. अनेकदा या भेटवस्तू गृहोपयोगी किंवा फराळापुरते मर्यादित असतात. परंतु, गुजरातच्या एका कंपनीने आपल्या कमर्चाऱ्यांना चक्क स्कूटर गिफ्ट म्हणून दिल्या आहेत. विशेष म्हणजे, या स्कूटर इलेक्ट्रिक असल्याने कमर्चाऱ्यांना वाढत्या पेट्रोल दरांची चिंता असणार नाही.

सुरत येथे असलेल्या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना हे दिवाळी गिफ्ट दिले आहे. पेट्रोलचे जवळपास रोज वाढणारे दर पाहता कंपनीने हा निर्णय घेतला आहे. यातून महागाईची समस्या तर सुटणारच, सोबतच पर्यावरणाला नुकसान देखील होणार नाही. आपल्या कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक स्कूटर देणाऱ्या कंपनीचे नाव अलायंस ग्रुप आहे.

अलायंस ग्रुपचे संचालक सुभाष डावर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, की पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. अशात कर्मचाऱ्यांना परवडेल या विचारातून इलेक्ट्रिक स्कूटर दिवाळी गिफ्ट म्हणून देण्याचा निर्णय घेतला. या कंपनीकडून एम्‍ब्रॉयडरी मशीनचा व्यवसाय केला जातो. सुभाष डावर यांचा मुलगा चिरागच्या हस्ते 35 कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक स्कूटर देण्यात आल्या आहेत.

इंधनाच्या वाढत्या किमती केवळ बामत्यांपुरते मर्यादित नाहीत. त्याचा फटका थेट सामान्य नागरिक, कर्मचारी आणि कंपन्यांना बसला आहे. त्यामुळे कंपनीने विचारपूर्वक निर्णय घेतला की जे कर्मचारी पेट्रोल बाइक किंवा स्कूटरने येत असतात. त्यांची बचत व्हावी यासाठी या इलेक्ट्रिक स्कूटर देण्यात आल्या. कंपनीने गुरुवारीच या स्कूटर आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये वितरित केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...