आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Diwali Indo Pak Army | After Three Years, BSF Distributed Sweets To Pakistan Rangers

भारत-पाक सीमेवर दिवाळी:तीन वर्षांनंतर भारत-पाकिस्तान सीमेवर सैनिकांनी एकमेकांना मिठाई दिली; पुलवामा हल्ल्यानंतर बंद झाली होती परमपरा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारत-पाकिस्तान सीमेवर तब्बल तीन वर्षांनंतर दिवाळीनिमित्त मैत्रीपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. दिवाळीचे निमित्त साधून भारत आणि पाकिस्तानच्या जवानांनी एकमेकांना मिठाई दिली. जम्मू-कश्मीर, पंजाब आणि राजस्थान इत्यादी सीमांवर हेच चित्र आज दिसून आले आहे. दरवर्षी होणारी मिठाई वाटपाची परमपरा गेल्या तीन वर्षांपासून बंद होती.

पुलवामा हल्ल्यानंतर बंद झाली होती परमपरा
भारत आणि पाकिस्तान सीमेवर सैनिकांमध्ये दरवर्षी दिवाळीनिमित्त एकमेकांना मिठाई देण्याची परमपरा असते. परंतु, तीन वर्षांपूर्वी पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला. फेब्रुवारी 2019 मध्ये CISF च्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला होता. तेव्हापासूनच ही परमपरा बंद करण्यात आली होती.

बाडमेर येथे BSF मे दिले लाडू
राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्याला लागून असलेल्या भारत-पाकिस्तान सीमेवर BSF आणि पाकिस्तान रेंजर्सने एकमेकांना मिठाई दिली. सोबतच दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या. मुनाबाव, गडरारोड, कैलनोर, बाखासर इत्यादी चौक्यांवर BSF कडून बाडमेर जिल्ह्यातील प्रसिद्ध गडरा लाडूसह अन्य गोड पदार्थ पाकिस्तानी सैनिकांना देण्यात आले. पाकिस्तानींनी सुद्धा भारतीय जवानांना तेथील प्रसिद्ध गोड पदार्थ दिले.

अटारी बॉर्डरवर मिठाई भरवून शुभेच्छा
BSF जवानांनी अमृतसर येथील प्रसिद्ध अटारी-वाघा बॉर्डरवर पाकिस्तानी रेंजर्सला दिवाळी निमित्त मिठाई भरवली. पाकिस्तानी रेंजर्सने सुद्धा हातांनी BSF जवानांना मिठाई खाऊ घातली.

जम्मू-काश्मीरात टीथवाल ब्रिजवर भेटले सैनिक
जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात LOC वर भारतीय सैनिक आणि पाकिस्तानी सैनिकांची भेट झाली. यावेळी दोन्ही देशांच्या सैनिकांनी एमेकांना मिठाई भरवून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सैनिकांनी गळाभेटही घेतली.

बातम्या आणखी आहेत...