आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार हे राजकारणातील अनुभवी खेळाडू आहेत. 7 वेळा आमदार राहिलेले डीके शिवकुमार यांनीही कर्नाटकात मंत्रिपद भूषवलेले आहे. डीके शिवकुमार हे कर्नाटकातील काँग्रेसचे संकटमोचक मानले जातात. जेव्हा-जेव्हा कर्नाटक किंवा गुजरातमध्ये कॉंग्रेस संकटात सापडली, तेव्हा डीके शिवकुमार यांनीच पक्षाला अडचणीतून बाहेर काढले.
कर्नाटक विधानसभा निकालाचे संपूर्ण कव्हरेज पाहण्यासाठी येथे क्लिक करा
काँग्रेसचे संकटमोचक आहेत डीके शिवकुमार
डीके शिवकुमार यांना काँग्रेसचे संकटमोचक का म्हटले जाते, याचा दाखला त्यांनी अनेकदा दिले आहे. 2018च्या विधानसभा निवडणुकीचा प्रसंग आहे. त्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. मात्र, भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी मोजक्याच आमदारांची गरज होती, पण ते होऊ शकले नाही. डीके शिवकुमार यांच्यामुळेच हे घडल्याचे बोलले जात आहे. डीकेंमुळेच काँग्रेस आणि जेडीएसचा एकही आमदार पक्ष बदलू शकला नाही आणि येडियुरप्पा सरकार स्थापन करू शकले नाहीत.
गुजरातेतही दाखवला करिश्मा
गुजरातमध्ये राज्यसभेची निवडणूक होती. अहमद पटेल काँग्रेसकडून निवडणूक लढवत होते. अनेक आमदारांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. अशा स्थितीत डीके शिवकुमार यांनी राज्यसभा निवडणुकीत पक्षाच्या विजयाची जबाबदारी घेतली. डीके यांनी गुजरात काँग्रेसच्या सर्व 44 आमदारांना बंगळुरू येथील त्यांच्या रिसॉर्टमध्ये पाठवले. याचा परिणाम असा झाला की एकाही आमदाराची बाजू बदलता आली नाही आणि अहमद पटेल निवडणूक जिंकून राज्यसभेत पोहोचले. त्यामुळेच ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक आहेत.
सर्वात श्रीमंत नेत्यांपैकी एक
डीके शिवकुमार हे देशातील सर्वात श्रीमंत राजकारण्यांपैकी एक आहेत. नुकत्याच सुरू असलेल्या कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामध्ये त्यांनी 1,413.78 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. 2018च्या निवडणुकीत त्यांनी एकूण 840 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. 2013 च्या निवडणुकीपेक्षा 590 कोटी रुपये जास्त होते.
भ्रष्टाचाराचे आरोप
डीके शिवकुमार यांनाही भ्रष्टाचारप्रकरणी अटक करण्यात आली होती. 2019 मध्ये, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवकुमार यांना मनी लाँड्रिंग आणि करचुकवेगिरीच्या आरोपाखाली अटक केली होती. नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात शिवकुमार आणि त्यांचे खासदार भाऊ डीके सुरेश यांचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत.
संबंधित वृत्त
कर्नाटक विधानसभेचा निकाल लाइव्ह अपडेट्स :सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.