आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • DMK MLA Dead Of Corona Virus In Chennai First Death Of Famous Political Leader In India

धक्कादायक:कोरोनाग्रस्त द्रमुक आमदाराचा मृत्यू, कोरोनामुळे नेत्याच्या मृत्यू झाल्याची देशातील पहिलीच घटना

चेन्नई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 3 जूनपासून व्हेंटिलेटरवर होते आमदार अंबाजगन, बुधवारी पहाटे निधन
Advertisement
Advertisement

देशात कोरोना व्हायरसचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच कोरोनामुळे एका आमदाराचे निधन झाल्याचे वृत्त बुधवारी समोर आले आहे. तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कडघमचे आमदार जे अंबाजगन यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना 2 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनावर द्रमुकचे अध्यक्ष एमके स्टॅलिन यांनी शोक व्यक्त केला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर डॉ. रेला इंस्टिट्युट अँड मेडिकल सेंटरमध्ये उपचार केले जात होते. कोरोनामुळे त्यांना न्युमोनिया झाला होता. यानंतर त्यांची प्रकृती आणखी बिघडली. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यासह अनेक प्रकारचे उपाय करण्यात आले. परंतु, सर्वच प्रयत्न अपयशी ठरले आणि बुधवारी सकाळी त्यांचे निधन झाले.

स्टॅलिन शोकाकुल

द्रमुक अध्यक्ष एमके स्टॅलिन यांनी आपल्या पक्षाच्या आमदाराच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी एका भावनिक पोस्टमध्ये अंबाजगन यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांना भाऊ या शब्दात संबोधित करताना ते नेहमीच लोकांच्या सेवेसाठी समर्पित होते. अनेकांसाठी ते एक पेटती मशाल होते. कोरोनाच्या संकटातही त्यांनी अनेकांची पुढे येऊन मदत केली. द्रमुकने महामारीच्या संकटात राबविलेल्या मोहिमेत त्यांनी सक्रीय सहभाग नोंदविला होता. परंतु, दुर्दैवाने त्यांनाच कोरोनाची लागण झाली असे स्टॅलिन म्हणाले. डीएमके आमदार अंबाजगन यांच्या बलिदालाना पक्षाने सलाम केला. कोरोनासोबतच, त्यांना किडनीचा गंभीर आजार होता. त्यांना 3 जूनपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. परंतु, त्यांच्या आरोग्यात काहीच सुधारणा झाली नाही. त्यात सोमवारी प्रकृती अचानक बिघडली आणि बुधवारी निधनाचे वृत्त समोर आले.

Advertisement
0