आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाच वर्षांपूर्वी जयललिता यांचा ७५ दिवसांच्या उपचारानंतर गूढ मृत्यू झाला होता. त्याची छाया आगामी निवडणुकीवर दिसतेय. सत्ताधारी एआयएडीएमके व विरोधी डीएमके हे दोन्ही पक्ष हा मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. डीएमके सातत्याने एक आश्वासन देत आहे. सत्तेवर आल्यानंतर एक वर्षात मृत्यूच्या रहस्याचा तपास केला जाईल. मुख्यमंत्री पलानीसामी यांनी प्रचारादरम्यान डीएमकेच अम्मांच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप करून वादाला तोंड फोडले आहे. डीएमकेच्या स्टॅलिन यांनी पलटवार करताना ईपीएसला आपल्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे खुले आव्हान दिले आहे. मृत्यूच्या तपासासाठी विद्यमान मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या आयोगाचा कार्यकाळ दहाव्यांदा वाढवण्यात आला. २०१७ मध्ये उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील आयोगाने तीन महिन्यांत अहवाल देणे अपेक्षित होते. मात्र जयललिता यांचे खरे वारसदार अशी आेळख सांगणारे ई पलानीसामी यांनी डाव उलटा पडेल, असा विचारही केला नसावा. आता स्टॅलिन आपल्या सभांतून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यावर मृत्यूवरून सत्य दडवण्याचा आरोप करू लागले आहेत.
ह्रदयविकाराचा झटका : जयललिता यांना २ डिसेंबर २०१६ रोजी डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा ५ डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला. वास्तविक सायंकाळच्या बुलेटिनमध्ये प्रकृतीत सुधारणा होणे आणि लवकरच डिस्चार्ज केला जाईल, असे सांगितले होते. त्यात ७५ दिवस रुग्णालयात दाखल होत्या. अरुण जेटली, अमित शहा, राहुल गांधी, उपराष्ट्रपती नायडू, किरण बेदींसह अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली. त्यांना अपोलो रुग्णालयाच्या अध्यक्षांच्या कक्षात केवळ शशिकला, रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांकडून माहिती देण्यात आली. जयललितांना कोणीही भेटू शकले नव्हते.
आसाममध्ये सरकार आल्यास सीएए रद्द करू : राहुल
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी आसाममधील दिब्रुगडमध्ये निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. लाहोवालमध्ये विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास सीएए लागू होणार नाही, असे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी अलीकडे केरळमध्येही पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला.
रहस्यमय मृत्यूशी संबंधित काही प्रमुख चेहरे, वाद
शशिकला - निकटवर्तीय मित्र : घरापासून रुग्णालयापर्यंत त्याच जवळ राहत होत्या. आैषधींचा आेव्हरडोस, स्लो पॉयझन देण्याचे त्यांच्यावर आरोप.
ईपीएस- मुख्यमंत्री तामिळनाडू शशिकलांना पक्षातून बाहेर करून तीन महिन्यांत तपास आयोगाची स्थापना केली. तीन वर्षांनंतरही काहीही स्पष्ट झाले नाही.
प्रतापसिंह रेड्डी- अध्यक्ष, अपोलो: अपोलो रुग्णालयाच्या आयसीयूचे कॅमेरे बंद होते. ते कोणाच्या सांगण्यावरून बंद होते. तेही रहस्यच
ओपीएस- उपमुख्यमंत्री: विरोधक त्यांना एआयडीएमकेमधील भाजपचे स्लीपर सेल म्हणतात. हेच सीएम होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.