आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Do Not Go Out Unnecessarily । Wear A Mask Even Within Family । Says Niti Aayog On COVID19 Situation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अधिक काळजी घेण्याची गरज:आता घरातही मास्क लावण्याची वेळ आलीये, एका संक्रमितापासून महिन्याभरात 406 लोकांना लागण

नवी दिल्ली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मासिक पाळीदरम्यान लसीकरण सुरक्षित

भारतातील वाढत्या कोरोना संक्रमणामुळे सरकारही लाचार झालेलं दिसत आहे. सोमवारी निती आयोगाने म्हटले, ''आता अशी वेळ आलीये, की घरातही मास्क घालावा लागेल. याशिवाय आता कोणत्याही पाहुण्याला आपल्या घरात बोलवू नका.'' निती आयोगातील आरोग्य मंत्रालयाचे सभासद डॉक्टर वीके पॉल म्हणाले की- 'सध्याच्या परिस्थितीती भिती पसरवू नका, यामुळे परिस्थिती अजून बिघडू शकते.'

एक संक्रमित 30 दिवसांमध्ये 406 लोकांना संक्रमित करत आहे

डॉ. पॉल पुढे म्हणाले की- रिसर्च सांगतो की, एखाद्या व्यक्तीने फिजिकल डिस्टेंसिंगचे पालन केले नाही, तर तो 30 दिवसांमध्ये 406 लोकांना संक्रमित करू शकतो. जर एखाद्या पॉझिटिव्ह व्यक्तीने बाहेर जाणे 50% कमी केले, तर एका महीन्यात 15 आणि 75% कमी केल्यावर फक्त 2-3 लोकांना संक्रमित करेल. होम आयसोलेशनमध्ये संक्रमण नसलेल्या व्यक्तीने मास्क लावला आणि संक्रमित व्यक्तीने मास्क लावला नाही, तर संक्रमणाचा धोका 30% असेल. जर दोन्ही व्यक्तीने मास्क लावला, तर संक्रमणाचा धोका फक्त 1.5% असेल.

सरकारने सांगितल्यानुसार, संपूर्ण देशात आतापर्यंत 14 कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे. एक कोटींपेक्षा जास्त लोकांना दुसरा डोसही लागला आहे. झारखंड, गुजरात, छत्तीसगडसारख्या 12 राज्यांना आपल्या 90% पेक्षा जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस दिला आहे.

मासिक पाळीदरम्यान लसीकरण सुरक्षित

महिलांशी संबंधित एका प्रश्नावर सरकारने म्हटले की, मासिक पाळीदरम्यान लस घेणे सुरक्षित आहे. लसीकरणाचा आणि मासिक पाळीचा काहीच संबंध नाही. याबाबत मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर अफवा पसरत होत्या.

बातम्या आणखी आहेत...